Maharashtra News LIVE : ठाणे जिल्ह्यात ६ जुलै रोजी सर्व शाळा-अंगणवाड्यांना सुट्टी
Maharashtra News LIVE : मुंबई व उपनगरांत सलग 4 दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. मुंबईच्या विविध भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. विविध भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील महत्वाच्या घडामोडी, पावसाचे अपडेटस, क्रीडा, मनोरंज, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. काही भागात रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. वसईमध्ये रस्त्यावर जवळपास तीन फूट पाणी साचलं आहे. या पाण्यातून लोकांना वाट काढत चालावे लागत आहे. हवामान विभागाने कालनंतर आज देखील रेड अलर्ट जारी केला आहे. तर पावसांचं संकट सोमवारपर्यंत असणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. मुंबई आणि जवळच्या शहरात झालेल्या पावसामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. मुंबईतील तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. मुंबईत ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचल्याने सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले. तर याच पावसात मुंबईच्या दादरमध्ये ठाकरे गटाचे आंदोलन होणार आहे. ठाकरे गट अयोध्या येथील कथिक गैरव्यवहाराच्या विरोधात दादरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार आहे. यासह राज्यातील महत्वाच्या बातम्या, पावसाचे अपडेट्स, तसेच क्रीडा, मनोरंजन, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करायला विसरू नका.
LIVE NEWS & UPDATES
-
ठाण्यात उद्या सर्व शाळांना सुट्टी
ठाणे जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाच्या अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना रविवार, ६ जुलै रोजी सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
-
उद्या नवी मुबंईमध्ये पालिकेच्या सर्व शाळांना सुट्टी
राज्यभरात सध्या पाऊस धुमाकूळ घालत आहे, उद्या देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. नवी मुंबईमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
-
-
ठाण्यातील कोपरी परिसरात भर बाजारात इलेक्ट्रिक पोल पडल्याची घटना
ठाण्यातील कोपरी परिसरात भर बाजारात इलेक्ट्रिक पोल पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. इलेक्ट्रिक पोल बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
-
पुण्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात
पुण्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात
शहराच्या विविध सकल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात
जोरदार पावसामुळे नागरिकांचे हाल
पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागाचा पुणे जिल्ह्यासाठी अंदाज
-
मुंबईतील सर्व शाळा-कॉलेजना सोमवारी ६ जुलै २०२६ रोजी सुटी
मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांना सोमवार , दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला उद्या सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाचा ( Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे.
-
-
ठाणे जिल्ह्यात ६ जुलै रोजी सर्व शाळा-अंगणवाड्यांना सुट्टी
हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्यात ६ जुलै रोजी सर्व शाळा-अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ६ जुलैसाठी ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
-
नाशिक मुंबई महामार्गावर धबधबा पॉईंटजवळ भरधाव ट्रकची कारला धडक, तीन जखमी
नाशिक मुंबई महामार्गावर धबधबा पॉईंटजवळ भरधाव ट्रकची कारला धडक बसल्याने कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहे. जखमींना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
-
9 जुलैपर्यंत अमरनाथ यात्रेसाठीच्या सर्व जागा भरल्या
जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने शनिवारी, ज्या यात्रेकरूंनी अद्याप नोंदणी केलेली नाही आणि वार्षिक अमरनाथ यात्रेला जाण्याची योजना आखत आहेत, त्यांना आपली यात्रा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने सांगितले की, मोठ्या संख्येने येणाऱ्या यात्रेकरूंमुळे 9 जुलैपर्यंतच्या नोंदणीच्या सर्व जागा आरक्षित झाल्या आहेत.
-
अमरनाथ यात्रेकरूंना मोठा दिलासा! जम्मू-श्रीनगर आता थेट विशेष रेल्वेने जोडले
भारतीय रेल्वेने अमरनाथ यात्रेकरूंच्या सोयीसाठी जम्मू आणि श्रीनगर दरम्यान थेट संपर्क साधणारी विशेष रेल्वे सेवा सुरू केली आहे.
#WATCH | Srinagar, J&K: Indian Railways has launched special train services to support Amarnath Yatra pilgrims, providing direct connectivity from Jammu to Srinagar. pic.twitter.com/aGmChhQWCm
— ANI (@ANI) July 5, 2026
-
उद्धव ठाकरे यांनी 7 जुलै रोजी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली
उद्धव ठाकरे यांनी मंगळवार, 7 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता मातोश्री येथे पक्षाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती, पक्षाची रणनीती आणि आमदारांसोबत समन्वय यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
-
नालासोपाऱ्यात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं
नालासोपाऱ्यातील रस्ते पाण्याखाली गेले असून तलावाचं स्वरूप आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी या साचलेल्या पाण्यात रिसॉर्टसारखा आनंद घेतला. पण असं करणं आरोग्याला घातक ठरू शकतं. इतकंच काय तर मोठी दुर्घटना होऊ शकते.
-
राम मंदिरातील चोरी प्रकरण: आरोपीची तुरुंगात 5 तास चौकशी
राम मंदिरातील चोरी प्रकरणातील, अयोध्या कारागृहात असलेल्या पाच आरोपींची चौकशी पूर्ण झाली आहे. तुरुंग अधिकाऱ्याने स्वतः टिन्नू यादव यांच्यासह पाचही आरोपींची कारागृहात जवळपास पाच तास चौकशी केली.
-
गुहागर–विजापूर मार्गावर साचले पाणी; मिरजोळी येथे रस्ता पाण्याखाली
रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुहागर–विजापूर मार्गावरील चिपळूणजवळील मिरजोळी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्त्याचा काही भाग पाण्याखाली गेला असून वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे.
-
गोंदिया : आमगाव येथील सिद्धार्थ नगर, रेणुका नगर आणि द्वारका नगरमध्ये शिरले पाणी
गोंदिया जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे आमगाव शहरातील सिद्धार्थ नगर ,रेणुका नगर आणि द्वारका नगर, यशवंत नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. नगरपरिषदेच्या वतीने पावसाच्या निचरा करण्याकरता योग्य व्यवस्था न करण्यात आल्याने घरात पाणी साचल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
-
राम मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाहीत – उद्धव ठाकरे
राम मंदिर दान चोरी प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन करत आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘हिंदू भोळे भाबडे पण मूर्ख नाहीत, मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाहीत. राम मंदिरासाठी कारसेवकांनी रक्त सांडलं. ‘ यावेळी दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली.
-
राम मंदिर दान चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंचे दादरमध्ये रामरक्षा आंदोलन
राम मंदिर दान चोरी प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आदित्य ठाकरे, संजय राऊत, किशोरी पेडणेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक दादरमध्ये उपस्थित आहेत.
-
येत्या 8 दिवसांत ऑपरेशन टायगर-3 होईल- भोंडेकर
भंडाऱ्यात आज खड्डेमय रस्त्यांच्या विरोधात झालेल्या आंदोलना दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना ऑपरेशन टायगर 3 वर प्रश्न विचारला असता सूचक वक्तव्य करत, “येतात जातात तुम्ही काळजी करू नका ब्रेकिंग न्यूज मिळत राहील”, येत्या 8 दिवसात ऑपरेशन टायगर 3 होईल असा सूचक ईशारा देखील त्यांनी दिलेला आहे.
-
साताऱ्यात नववीतील विद्यार्थ्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
साताऱ्यात नववीतील विद्यार्थ्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. स्वप्नील आवकिरकर याचं अवघ्या 15 व्या वर्षी निधन. विद्यार्थ्याच्या अकाली जाण्याने ठोसेघर परिसरात शोककळा
-
मुंबईतील वांद्रे पूर्वच्या खेरवाडी परिसरात झाड कोसळलं
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बांद्रा पूर्वेच्या खेरवाडी परिसरात एक मोठा अपघात झाला आहे. येथे एक प्रचंड झाड अचानक कोसळलं आणि अनेक गाड्या त्याच्या तडाख्यात सापडल्या.
-
रत्नागिरीच्या मंडणगडात मुसळधार पावसामुळे तुळशी घाट
रत्नागिरीच्या मंडणगडात मुसळधार पावसामुळे तुळशी घाट, बाणकोट मार्गावर दरड कोसळली..दरड कोसळ्याने वाहतूक ठप्प झाली…संबंधित मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली….
-
उल्हास नदीच्या वाढत्या धोक्यामुळे रायता पूल बंद
उल्हास नदीच्या वेगवान प्रवाह आणि वाढत्या पाणीपातळीमुळे कल्याणजवळील रायता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. कल्याण तालुका पोलिसांनी पुलाच्या दोन्ही टोकांवर बॅरिकेड्स लावून वाहनांची ये-जा रोखली. वाहनचालकांना आणि नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-
आमदार अमित साटम यांच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली
मनसे कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. साकीनाका येथे झालेल्या मॅनहोल दुर्घटनेनंतर भाजप आमदार अमित साटम यांचा हसताना एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि आज मुंबईतील विविध भागात त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
-
रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात शिवसेना आक्रमक
भंडारा शहरात ठीक ठिकाणी रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. मागील तीन दिवसांपासून भंडाऱ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि हे खड्डे जन्मय झाले. या खड्ड्यांमधून मार्ग काढताना नागरिकांना त्याचा अंदाज येत नसल्यानं अनेकांचे अपघात घडलेत. अनेक जण जखमी झालेत. भंडारा शहरातील खाम तलाव चौक परिसरातुन जाणारा मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून या विरोधात आज शिंदे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आंदोलन केलं.
-
कुंडलिका नदी काठावरील 22 पर्यटकांना केले रेस्क्यू
रायगड – रोहा तालुक्यातील बाहे गावातील कुंडलिका नदी काठावरील SP फॉर्म हाउस येथे काल रात्री मौजे खांब गाव कोलाड येथील 22 पर्यटक फिरण्याकरिता आले होते. रात्री अती मुसळधार पाऊस झाल्याने कुंडलिका नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्याने 22 पर्यटक SP फॉर्म येथे अडकले होते. त्यांना आज दिनांक 05/07/2026 रोजी SVRRS टीमच्या मदतीने 22 पर्यटक यांना बाहेर सुखरूप पणे काढण्यात आले आहे.
-
ठाकरेंची भूमिका सरड्याचा रंग बदलतात तशी बदलत आहे- संजय शिरसाट
उद्धव ठाकरेंची भूमिका आजकाल सरड्याचा रंग बदलतात तशी बदलू लागली आहे.आता त्यांचा आंदोलन आहे रामाबद्दल सर्वांना आस्था असली तर काँग्रेसने त्या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे, शरद पवारांनी आंदोलना सहभागी झालं पाहिजे. आम्ही रामभक्त आहे असं सांगायचं आणि आंदोलनातून पळ काढायचा. आता उद्धव ठाकरे यांना एकट्यांनाच ते आंदोलन करावे लागेल अशी आताची स्थिती आहे.परंतु एकदा सोडलेल हिंदुत्व पुन्हा त्या लाईन वर जायला आता त्यांना अडचणीचे ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
-
दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त
राज्यातील दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत, तब्बल अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि एफडीएच्या पथकाने संयुक्तपणे ही मोठी कारवाई केलीये. पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, सांगली आणि भिवंडीत विविध ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करण्यात आलीये. 13 जणांना बेड्या ही ठोकण्यात आल्यात. दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून डेअरीत येणाऱ्या दूध मध्ये भेसळ केली जात होती. 500 लीटर दुधात तब्बल 300 लीटर, तसेच 1000 लीटर दुधात 500 लीटर असं भेसळीचं प्रमाण होतं. वास न येणारा शाम्पू, दुधाची पावडर आणि केमिकल पाण्यात मिसळून ही भेसळ केली जात होती. त्यानंतर हे भेसळीचं दूध नामांकित कंपन्यांमध्ये पुरवलं जायचं
-
मंडणगडात मुसळधार पावसाचा फटका; तुळशी घाट, बाणकोट मार्गावर दरडी, वाहतूक ठप्प
रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंडणगड तालुक्यातील तुळशी घाट आणि मंडणगड–बाणकोट मार्गावर दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
-
आंबा नदीचे पाणी कोलेटी गावात शिरले
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील आंबा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे नदीचे पाणी कोलेटी गावात शिरले असून गावातील अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे.
-
हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया
पुणे कात्रज-कोंढवा मुख्य रस्त्यावरील गोकुळनगर चौकात पाणीपुरवठा वाहिनी फुटल्याने २०-३० फुट उंच पाण्याचे फवारे उडाले. हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले. जलवाहिनी तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
-
बांद्रा पूर्वेच्या खेरवाडी परिसरात झाड कोसळले
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बांद्रा पूर्वेच्या खेरवाडी परिसरात एक मोठा अपघात झाला आहे. येथे एक मोठे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले आणि झाडाखाली अनेक वाहनांचे नुकसान झाले.तुम्ही पाहू शकता हा बांद्रा पूर्वेचा खेरवाडी शासकीय वसाहत परिसर आहे. जोरदार पावसानंतर इथलं एक मोठं झाड थेट उभ्या असलेल्या गाड्यांवर पडलं. झाड कोसळल्याने अनेक कारांचं नुकसान झालं आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे या संपूर्ण घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. पण या घटनेत ७ कार आणि तीन दुचाकींचे नुकसान झाले.
-
नागपूरच्या बडकस चौकात भव्य रिंगण सोहळा
आषाढी वारीनिमित्त श्री महावैष्णव नागपूरकर दिंडी २०२६ अंतर्गत नागपूरच्या बडकस चौकात भव्य रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. या एकदिवसीय पायी दिंडीत मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक सहभागी झाले. बडकस चौकात पार पडलेल्या रिंगण सोहळ्यात टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. महिलांनी लाल साडी तर पुरुषांनी पांढरी वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभाग घेतला. आगामी पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सोहळ्याला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
-
मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
घाटमाथा, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नदीची धोक्याची पातळी १७.५० मीटर असून पाणी १६.२० मीटरपर्यंत पोहोचल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. कर्जत आणि रायगड भागातील पावसाचा जोर ओसरल्याने नदीची पातळी आता हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी किंवा पाणी पाहण्यासाठी नदीकिनारी गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
-
कुर्ल्याच्या नौपाडा परिसरात झाड कोसळून एका वृद्धाचा मृत्यू
कुर्ल्याच्या नौपाडा परिसरात झाड कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. कमानी परिसरात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू झाला आहे. वृद्धाच्या मृत्यूनंतर मनसे आक्रमक झाली आहे.
-
मंडणगडात मुसळधार पावसाचा फटका; तुळशी घाट, बाणकोट मार्गावर दरडी, वाहतूक ठप्प
रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंडणगड तालुक्यातील तुळशी घाट आणि मंडणगड–बाणकोट मार्गावर दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
-
अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात
अभिनेता आमिर खानने तिसऱ्यांदा लग्न केलं आहे. गौरी स्प्रॅट आणि आमिर खान यांनी विशेष विवाह कायद्याअंतर्गत लग्न केलं. दोघांनी स्वाक्षरी करून आयुष्याची नवी सुरूवात केली आहे. मुंबईतील राहत्या घरी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं आहे.
-
येवल्यात दराडेंना धक्का; शिवसेनेचे सात नगरसेवक राष्ट्रवादीच्या गटात सामील होणार?
येवल्यात शिवसेनेचे सात नगरसेवक राष्ट्रवादीच्या गटात सामील होणार असल्याचं कळतंय. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नगरसेवकांची भुजबळ संपर्क कार्यालयात बैठक झाली. आमदार किशोर दराडे आणि कुणाल दराडे यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याची खंत नगरसेवकांनी व्यक्त केली. नाशिक विधान परिषदेतील दराडे यांच्या पराभवानंतर येवल्यातील शिवसेनेची ताकदही कमी होऊ लागल्याचं चित्र समोर येत आहे. दराडेंच्या पराभवानंतर येवल्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
-
पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टी आणि पुणे घाटमाट्यावरती रेड अलर्ट असणार….
आठ तारखेनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसेल. मुंबईच्या तुलनेत पुण्यामध्ये नक्कीच पाऊस कमी पडतोय. जास्त पाऊस घाटमाथ्यावरती पडतो. मराठवाड्यात पाऊस पडतोय मात्र त्याची स्थिती आणखी चांगली नाही…
-
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत देवयानी पाटील डोणगावकर यांचा पराभव.
ठाकरे शिवसेनेच्या वतीने औरंगाबाद – जालना विधान परिषदेसाठी देवयानी पाटील डोणगावकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचे कारण देत ऐनवेळी देवयानी पाटील डोणगावकर यांनी विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. देवयानी पाटील डोणगावकर यांनी विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांची व त्यांचे पत्नी कृष्णा पाटील डोणगावकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.
-
रस्त्यावर हुल्लडबाजी करत तरुणींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांचा चांगलाच दणका
पुण्याच्या हिंजवडीत वाढदिवसाच्या नावाखाली रस्त्यावर हुल्लडबाजी करत तरुणींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच हिंजवडी पोलिसांनी संबंधित तरुणांना ताब्यात घेऊन समज दिली. विशेष म्हणजे, जे तरुण काही वेळापूर्वी मुलींना त्रास देत होते, त्यांनाच आता कॅमेऱ्यासमोर येऊन “महिलांचा सन्मान करा, असा टवाळखोरपणा करू नका,” असे आवाहन करावे लागले.
-
गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथे नालेसफाईकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथे नालेसफाईकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे. नालेसफाई न केल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले, तर अनेक ठिकाणी नाल्यातील गाळ रस्त्यावर अल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्वरित लक्ष देऊन नाले सफाई करावी अशी नागरिकांनी मागणी केली. अन्यथा ग्रामपंचायत मध्ये आंदोलन करणार अशा नागरिकांनी इशारा दिलाय.
-
गोंदिया जिल्ह्यात पावसाची पुन्हा एकदा तुफान बॅटिंग….
गेल्या पाच दिवसाच्या सतत पावसानंतर गोंदिया जिल्ह्यात आज पुन्हा पावसाने तुफान बॅटिंग केली…. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पुन्हा मुसळधार पाऊस बरसत असल्याने या पावसामुळे जिल्ह्याच्या धरण साठे मध्ये मोठी वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला. आहे तसेच रस्त्यातील पुलावरून पाणी वाहत असल्यास नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे…
-
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे शेतकरी विकास पॅनल विजयी
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे शेतकरी विकास पॅनल विजयी. मंत्री अतुल सावे, आमदार अंबादास दानवे, आमदार संजना जाधव, आमदार अनुराधा चव्हाण यांचा विजय.आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्त्याकडून फटाके फोडत जोरदार घोषणाबाजी. आमदार अनुराधा चव्हाण औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दाखल.
-
बदलापुरात उल्हास नदीचा प्रवाह वाढला
बदलापुरात उल्हास नदीचा प्रवाह वाढला. नदीकाठची चौपाटी पाण्याखाली. उल्हास नदीच्या प्रवाहाने घेतला वेग. उल्हास नदीच्या वाढत्या पाणीपातळीने प्रशासन सतर्क
-
कसारा घाट धुक्यात हरवलेलं ..पावसाळ्यात कसारा घाटाचं निसर्गसौंदर्य
पावसाच्या संततधार सरींमुळे कसारा घाटाचं सौंदर्य खुललं. संपूर्ण घाट दाट धुक्याच्या चादरीत हरवला; नयनरम्य दृश्यांनी मन मोहून टाकलं. डोंगरकड्यांवरून कोसळणारे धबधबे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरले. हिरवाई, धुकं आणि थंडगार वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली. मुंबई, ठाणे आणि नाशिक परिसरातून पर्यटक खास कसारा घाटाकडे आकर्षित होत आहेत. धुक्यातून धावणाऱ्या रेल्वेचं दृश्य पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरत आहे. सेल्फी आणि पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षिततेचं भान राखण्याचं प्रशासनाचं आवाहन. पाऊस आला की कसारा हसतो’ म्हणत घाट पुन्हा एकदा पावसाळी पर्यटनाचं केंद्र बनला.
-
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिग्गजांची एन्ट्री
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिग्गजांची एन्ट्री. बँकेच्या संचालक मंडळावर जिल्ह्यातील मंत्री, खासदार व आमदारांचेच वर्चस्व. संचालक मंडळाच्या 21 सदस्यांपैकी 2 मंत्री, 1 खासदार, 5 आमदार संचालक मंडळावर पालकमंत्री संजय शिरसाट बिनविरोध, कॅबिनेट मंत्री अतुल सावे विजयी. आमदार रमेश बोरनारे बिनविरोध. आमदार अंबादास दानवे विजयी. आमदार विलास भुमरे बिनविरोध. आमदार अनुराधा चव्हाण विजयी. आमदार संजना जाधव विजयी. खासदार डॉ. कल्याण काळे विजयी
-
नाशिकच्या म्हासरुळ येथील पीकॉक हील येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण
हरित कुंभ अभियानाच्या अंतर्गत नाशिकचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प. मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्ष लागवड आणि नदी संवर्धन, स्वच्छता मोहीम नाशिकमध्ये सुरू. नाशिकचे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच महापौर उपमहापौर यांच्या उपस्थितीत उन्नत नाशिक अभियान अंतर्गत वृक्ष लागवड
-
चार दिवसांपासून संततधार पाऊस; धरणसाठ्यात झपाट्याने वाढ
पिंपळगाव खांड लघु धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो. अतिरिक्त पाणी थेट मुळा धरणाकडे; आवक वेगाने सुरू. भंडारदरा धरणातील पाणीसाठा 30% वर. 24 तासांत 218 एमसीएफटी नव्या पाण्याची आवक. निळवंडे, आढळा, वाकी धरणांमध्येही पाणीसाठ्यात वाढ. नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. लाभक्षेत्रातील शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण…
-
सीतेला अर्पण केलेली 27 मंगळसूत्रे चोरीला संजय राऊतांचा दावा
सीतेला अर्पण केलेली 27 मंगळसूत्रे चोरीला गेल्याचा मोठा दावा नुकताच संजय राऊत यांनी केला. यादरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करताना संजय राऊत दिसले आहेत.
-
एका आमदाराला 20 कोटींची ऑफर- संजय राऊत
नुकताच संजय राऊत यांनी मोठा दावा केला. संजय राऊत म्हणाले की, एका आमदाराला 20 कोटीची ऑफर देण्यात आली. राऊतांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडालीये.
-
राजकारणात कुठे थांबायचे हे कळायला हवे- संजय राऊत
नुकताच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, अजून किती पाहिजे आहे? शिंदे जर आजारी असतील तर त्यांना आाराम मिळतो. राजकारणात कुठे थांबायचे हे कळायला हवे.
-
पुण्यात जोरदार पाऊस, सोसायटीची भिंत कोसळली
पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सोसायटीची सीमा भिंत कोसळली. पुण्यातील जांभूळवाडी परिसरात ही घटना घडली. पार्किंग शेडवर भिंत कोसळून वाहनांचे नुकसान झालं. सोसायटीची सीमा भिंत कोसळून अनेक वाहनांचे नुकसान झालं.
-
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात साखळी आंदोलन
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) वाचवण्यासाठी ठाण्यात पर्यावरणप्रेमीकडून मानवी दीड ते दोन किलोमीटर लांब साखळी आंदोलन करण्यात आलं. मिशन ‘SAVE SGNP’ अंतर्गत मानपाडा ते खेवर सर्कल पर्यंत पर्यावरणप्रेमी कडून मानवी साखळी करत शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे. उद्यानाची १९३ एकर वनजमीन तातडीने वन विभागाकडे हस्तांतरित करण्याची आंदोलकांची मुख्य मागणी आहे. ठाणे महानगरपालिकेने (TMC) १०० एकर जागेवर टाकलेली सर्व आरक्षणे रद्द करण्याची मागणी आहे. वनसंपदेला धोका निर्माण करणारा ४० मीटर पायथ्याचा रस्ता रद्द करण्यासाठी पर्यावरणप्रेमी तसेच ठाणेकर रस्त्यावर उतरले आहेत. ठाण्यातील मानपाडा ते खेवरा सर्कल अशी तब्बल दीड ते दोन किलोमीटर मानवी साखळी रचत हजार पेक्षाही अधिक नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.
-
नवी मुंबईत जॉगिंग ट्रॅकवर कोसळलं झाड
सानपाडा ते वाशी दरम्यान फुटपाथच्या मध्ये असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर दोन दिवसांपूर्वी झाड कोसळलं होतं. मात्र अद्यापही नवी मुबंई उद्यान विभागाने हे झाड फुटपाथ वरच ठेवलंय. जॉगिंग ट्रॅकवर झाड कोसळ होतं, तेव्हा जॉकिंग करणारा वर्ग नव्हता, त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. अद्यापही भलं मोठं झाड हे फुटपाथ वरतीच असल्याचे चित्र पाहायला मिळतय. त्यामुळे नवी मुबंईकरानी फुटपाथ वरती कसं चालणार आत कारण झाड अजून फूटपाथ वरतीच आहे.
-
अंबरनाथहून बदलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी
अंबरनाथहून बदलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचलं आहे. या पावसामुळे वाहतूक मंद गतीने होत आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. या मुसळधार पावसामुळे प्रशासनही अलर्ट झालं आहे.
Published On - Jul 05,2026 9:10 AM
