AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपसभापती मॉर्निंग वॉकला गेलेले, परत आलेच नाही! शोध घेताच सापडले झाडाला लटकलेल्या अवस्थेत

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्यातील उपसभापती सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर बराच वेळ घरी परता नाही. कुटुंबियांनी शोध घेतल्यानंतर तो लटकलेल्या अवस्थेत सापडला.

उपसभापती मॉर्निंग वॉकला गेलेले, परत आलेच नाही! शोध घेताच सापडले झाडाला लटकलेल्या अवस्थेत
Arun GhugeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 05, 2026 | 9:16 AM
Share

जालन्यातील अंबड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) उपसभापती अरुण घुगे यांनी शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ते घराजवळील शेतातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळले. अरुण घुगे यांनी टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडलेल्या अरुण घुगे बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधादरम्यान घराजवळील शेतात त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. अरुण घुगे यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे नेमके कारण काय आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी कोणतीही आत्महत्या नोट किंवा इतर पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे या घटनेचे गूढ अधिकच वाढले आहे. उपसभापतीने खरच स्वत:ला संपवले आहे की कोणी तरी हा कट रचून हत्या केली आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. घटनेची माहिती समजताच परिसरात मोठी खळबळ माजली आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातून या घटनेवर शोक व्यक्त करण्यात येत आहे.

वाचा: चामड्याच्या पट्ट्याने ते मारायचे… नागराज मंजुळेच्या पहिल्या बायकोचे गंभीर आरोप, ती सध्या काय करते?

पोलिस कारवाई

गोंदी पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला असून, आत्महत्येमागील कारण शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. अरुण घुगे यांच्या निधनाने बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा