AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चामड्याच्या पट्ट्याने ते मारायचे… नागराज मंजुळेच्या पहिल्या बायकोचे गंभीर आरोप, ती सध्या काय करते?

नागराज मंजुळे यांची दोन लग्न झाली आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांची पहिली पत्नी सध्या कुठे आहे? काय करते? तिला पोटगी म्हणून किती रुपये दिले होते वाचा...

| Updated on: Jul 04, 2026 | 4:25 PM
Share
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे ओळखले जातात. त्यांनी 'फँड्री', 'सैराट' आणि 'झुंड' सारख्या हिट सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतच नागराज मंजुळे यांचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिले. त्यांची पहिल्या पत्नीने त्यांच्यावर अनेक आरोप केले होते.

1 / 5
नागराज यांच्या पहिल्या पत्नी सुनीता मंजुळे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुनीता आणि नागराज यांचे लग्न १७ मे १९९७ रोजी झाले होते. त्या वेळी नागराज बारावीत शिकत होते आणि सुनीता केवळ १८ वर्षांच्या होत्या. 'क्विंट'ला दिलेल्या एका मुलाखतीत सुनीता यांनी सांगितले की, नागराज चित्रपट क्षेत्रात करिअर घडवत असताना त्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकट्याने सांभाळत होत्या.

2 / 5
सुनीता म्हणाल्या, “मला असे वाटते की त्यांना माझी लाज वाटायची. ते कलाक्षेत्रातील लोकांमध्ये वावरतात, महाराष्ट्रातील मोठमोठे लोक त्यांचा आदर करतात, पण मी केवळ आठवीपर्यंत शिकलेली आहे. त्यामुळे त्यांना मी फक्त घरची कामे करण्यासाठी आणि कुटुंब सांभाळण्यासाठी योग्य वाटले, पण सार्वजनिकरित्या अभिमानाने पत्नी म्हणून ओळख करून देण्याइतकी नाही.”

3 / 5
त्या पुढे म्हणाल्या, “ते यशस्वी झाल्यावर माझ्या कमी शिक्षणाची त्यांना लाज वाटू लागली आणि त्यांनी मला दूर केले. सुरुवातीचे दिवस दुर्लक्ष, उपेक्षा आणि मारहाणीचे होते. त्यांनी मला मूल होऊ दिले नाही. त्यासाठी मला चामड्याचे पट्टे व लाकडाच्या तुकड्याने मारहाणही करत असत. 'फँड्री'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर जेव्हा ते दिल्लीला गेले, तेव्हा त्यांनी मला घरात कोंडून ठेवले आणि बाहेर जाण्याची परवानगी दिली नाही.”

4 / 5
सध्या सुनीता मंजुळे आणि नागराज मंजुळे यांचा घटस्फोट झाला आहे. तडजोडीचा भाग म्हणून सुनीता यांना सात लाख रुपये देण्यात आले होते. उदरनिर्वाहासाठी आणि वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी त्या सध्या इतरांच्या घरी साफसफाईचे काम करतात.

5 / 5
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा

कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे