Sharad Pawar Press | मोदींच्या आवाहनावर शरद पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी इतका वेळ…..
मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकटाची भीती निर्माण झाली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांसाठी बंद झाल्याने भारतासह अनेक देशांवर इंधन आणि परकीय चलनाचा ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत, पेट्रोल-डिझेलचा कमी वापर, इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर, सोन्याची खरेदी टाळणे आणि अनावश्यक परदेश दौरे न करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, पंतप्रधानांच्या या आवाहनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला गांभीर्याने घेतले पाहिजे. देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये असे वाटत असेल, तर काही कठोर उपाययोजना कराव्याच लागतील. यापूर्वीही देश अशा संकटांना सामोरा गेला आहे.”
यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, असे म्हटले. “देशासमोर गंभीर परिस्थिती उभी आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा होणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाल्यानंतरच इंधन बचतीचे आवाहन करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत शरद पवार यांनी सरकारला सवाल केला. “इंधन बचतीचा निर्णय घेण्यासाठी इतका वेळ का लागला? निवडणुकांदरम्यान जनजागृती का करण्यात आली नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाईकने मंत्रालयात येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, “जर मुख्यमंत्री मंत्रालयात बाईकने आले, तर लोक त्याला गांभीर्याने घेतील.”
Published on: May 14, 2026 05:26 PM
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच