गुलाब जामुनला इंग्रजीत काय म्हणतात? या लहान मुलीला माहितेय, बघा

गुलाब जामुनला इंग्रजीत काय म्हणतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? काळजी करायची गरज नाही या मुलीनं स्वतः उत्तर दिलंय.

गुलाब जामुनला इंग्रजीत काय म्हणतात? या लहान मुलीला माहितेय, बघा
gulab jamun in english
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 15, 2023 | 1:00 PM

तसं पाहिलं तर आजच्या काळात सोशल मीडिया हे एक असं व्यासपीठ बनलं आहे जिथे लोक आपला जास्तीत जास्त वेळ घालवतात. खऱ्या अर्थाने सोशल मीडिया हा व्हायरल व्हिडिओंचा खजिना आहे. इथे अनेकदा असे मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतात, जे लोकांचे भरपूर मनोरंजन करतात. विशेषत: मुलांशी संबंधित व्हिडिओ इंटरनेटवर खूप असतात. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जे लोक फक्त पाहत नाहीत तर भरभरून शेअर करत आहेत.

गुलाब जामुन भारतात खूप प्रसिद्ध आहे..! एखाद्या फॉरेनरने हे नाव पहिल्यांदा ऐकले तर त्याच्या मनात येईल की कदाचित ते गुलाब आणि बेरी एकत्र करून बनवले आहे, म्हणून त्याचे नाव गुलाब जामुन आहे.

गुलाब जामून वर असे अनेक व्हिडीओ आहेत. पण हा जरा हटके आहे. यात त्याला इंग्रजीत काय म्हणतात असं विचारण्यात आलंय. गुलाब जामुनला इंग्रजीत काय म्हणतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? काळजी करायची गरज नाही या मुलीनं स्वतः उत्तर दिलंय.

काही सेकंदाच्या या मजेशीर व्हिडिओमध्ये लहान मुलगी शिक्षकाप्रमाणे गुलाब जामुनचा इंग्रजी अर्थ समजावून सांगताना दिसत आहे. हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nayyab205 नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून त्यावर कमेंट्स दिल्या जात आहेत.