Tukaram Mundhe: अधिकारी पलिकडचा ‘बाप’माणूस! देशासाठी कडक, शिस्तप्रिय असलेल्या तुकाराम मुंढेचं हळवं रुप, मुलीसोबतचा Cute Video Viral

महाराष्ट्राचे आयएएस अधिकारी, तुकाराम हरिभाऊ मुंडे सध्या चर्चेत आहेत. मुंढे यांच्या कामगिरीमुळे आता अन्नभेसळ करणारे व्यवसायिक धासतावले आहेत. या दरम्यान तुकाराम मुंढे यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Tukaram Mundhe: अधिकारी पलिकडचा बापमाणूस! देशासाठी कडक, शिस्तप्रिय असलेल्या तुकाराम मुंढेचं हळवं रुप, मुलीसोबतचा Cute Video Viral
| Updated on: Aug 16, 2026 | 1:38 PM

महाराष्ट्राचे आयएएस अधिकारी, तुकाराम हरिभाऊ मुंडे, त्यांच्या कडक कार्यशैलीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी भेसळ करणाऱ्यांवर जलद कारवाई सुरू केली. त्यांच्या या कृतीमुळे अन्न व्यवसायातील लोक हादरले आहे, खरं तर तुकाराम मुंढे हे फक्त महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त आहेत पण चर्चा ही देशभरात सुरु आहे. कारण म्हणजे धडाधड कारवाई. तुकाराम मुंढे हे किती शिस्तप्रिय आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे पण आता त्यांचे एक असे रुप पाहायला मिळाले ज्याची जोरदार चर्चा होत आहे. तुकाराम मुंढे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्याची आता जोरदार चर्चा सुरु आहे.

तुकाराम मुंढे यांची सगळीकडे इतकी चर्चा आहे की त्यांनाच सगळीकडे अतिथी म्हणून बोलावले जाते, आतापर्यंत त्यांनी अनेक कार्यक्रमांना उपस्थितीत लावली आहे. या कार्यक्रमांमध्ये त्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरही बेधडकपणे दिली आहे. आता एका कार्यक्रमातील व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या कार्यक्रमात ते आपल्या कुटुंबासोबत हजर राहिलेले दिसत आहे. आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह ते हजर राहिले. या पत्नी आणि मुलगा मात्र बाजूला बसलेले दिसत आहे. मात्र मुलगी त्यांचा मांडीवर बसली आहे. यावरुन समजते की माणून बाहेर किती ही मोठा, प्रसिद्ध असो तो त्याच्या कुटुंबासमोर तो नेहमीत साधा राहतो. व्हायरल व्हिडिओमुळे त्यांचे त्यांच्या मुलीसोबतचे नाते स्पष्ट होते.

तुकाराम मुंढे यांना दोन मुले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुंढे यांच्या बेधडक कारवाईचा परिणाम त्यांच्या मुलांवरही होतो. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, “सततच्या बदल्यांमुळे कुटुंबावर परिणाम होतो. मुलांच्या शाळा अनेकदा बदलाव्या लागल्या. त्यामुळे त्यांचे खास मित्र झालेच नाहीत. माझ्यामुळे कुटुंबाला हा त्रास नक्कीच सहन करावा लागतो.” अशी खंत तुकाराम मुंढे यांनी बोलून दाखवली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us