
जीवनाचा एक नियम आहे, ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित आहे. निसर्गाचा हा नियम सर्वांना लागू होतो. जो जन्माला येतो त्याचे मरणं निश्चित आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पृथ्वीवर असा एक जीव जो अमर आहे. त्याचा मृत्यू होतच नाही. चला तर पाहूयात असा कोणता सजीव आहे ज्याचा मृत्यू कधीच होत नाही.
जीवनाचे हे एक अटळ सत्य आहे की जो जन्माला येणार त्याला एकेदिवशी इहलोकांची यात्रा संपवावी लागते.त्यामुळे जन्मला त्याचा मृत्यू देखील निश्चितच असतो. निसर्गाच्या या नियमाला काही जीव मात्र अपवाद आहेत. त्यातील काही तर आपल्याला अजून माहीतीही झालेले नाहीत. परंतू समुद्रात आढळणारा एक सजीव मात्र अमरत्वाचा पट्टा घेऊनच जन्माला आलेला आहे. चला तुम्हाला पृथ्वीवर असलेल्या या अनोख्या सजीवाबद्दल माहीती वाचूयात…
जगातील एकमात्र सजीव आहे ज्याचा कधीच मृत्यू होत नाही. ज्याला जवळपास अमरत्व प्राप्त झालेले आहे. तो सजीवाचे नाव ‘अमर जेलीफिश’ (Immortal Jellyfish) असे आहे. या जीवाचे वैज्ञानिक नाव ट्यूरिटोप्सिस डोहरनी (Turritopsis dohrnii) असे आहे. या जेली फिशला अमर म्हटले जाते. कारण कोणी याच्या मरण्याचा साक्षीदार नाहीए..ट्यूरिटोप्सिस डोहरनी जेलीफिश एक छोटा सजीव आहे. असे म्हटले जाते हा जगातील एकमेव असा सजीव आहे ज्याच्या मरणाचा पुरावा मिळालेला नाही आणि वयाचा देखील अंदाज लावता आलेला नाही. यामुळे याला अमर जेलीफिश असे नाव पडले आहे.
टुरिटोप्सिस डोहर्नी एकदा प्रौढ झाला की स्वत:ला पुन्हा तरुण अवस्थेत रुपांतरीत होतो. ज्यामुळे त्याचे जीवनचक्र दीर्घकाळ चालू राहाते.
त्याच्या पुनरुत्पादन क्षमतेमुळे हा जेलीफिश वृद्धत्वामुळे वा दुखापतीमुळे मरण्याऐवजी, तो जेलीफिश आपल्या पेशी विकसित केल्या आणि त्याच्या जीवनचक्राच्या सुरुवातीच्या टप्प्यात परत जातो, ज्यामुळे हा जेलीफिश सहसा नैसर्गिकरित्या मरत नाही, असे म्हटले जाते की टुरिटोप्सिस डोहर्नी फक्त तेव्हाच मरू शकते जेव्हा त्याला मोठे मासे खातात किंवा त्याला काही गंभीर आजार होता. अन्यथा त्याचे जीवनचक्र असेच सुरु राहते.