Video: ‘नागमणी घेऊनच गप्प बसणार वाटतं?’, भर रस्त्यात दोन तरुणींचा नागिन डान्स, स्टेप्स पाहून सर्वच थक्क

प्रसिद्ध होण्यासाठी मुली काय करतील याचा नेम नाही. असाच एक भर हायवेवर दोन तरुणींचा नागिन डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Video: नागमणी घेऊनच गप्प बसणार वाटतं?, भर रस्त्यात दोन तरुणींचा नागिन डान्स, स्टेप्स पाहून सर्वच थक्क
| Updated on: Jan 07, 2026 | 5:16 PM

Viral Video : सोशल मीडियावर एका रात्रीत प्रसिद्ध होण्याची इच्छा लोकांना काय करायला लावेल याचे धक्कादायक उदाहरण म्हणजे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी भर हायवेच्या मधोमध बसून एका गाण्यावर आडव्या पडून नागिन डान्स करताना दिसत आहेत. हा प्रकार पाहून एकीकडे नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे तर दुसरीकडे या स्टंटमागील गंभीर धोका पाहता अनेकांनी चिंता देखील व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रात्रीच्या वेळी वाहतुकीने गजबजलेल्या हायवेवर या दोन तरुणी अचानक रस्त्याच्या मधोमध डान्स सुरू करतात. कधी रस्त्यावर बसून तर कधी विचित्र हालचाली करत त्या नागिन डान्सच्या स्टेप्स करताना दिसत आहेत. ज्या ठिकाणी त्या डान्स करत आहेत त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था देखील नाहीये. फक्त वेगाने धावणाऱ्या वाहनांचा रस्त्यावर प्रसिद्ध होण्यासाठीची स्पर्धा सुरु आहे.

जीवघेण्या स्टंटकडे दुर्लक्ष

या व्हिडीओमध्ये एक तरुणी रस्त्यावर पडलेली दिसते तर दुसरी तिच्या आसपास उभी राहून डान्स करताना दिसते आहे. हा संपूर्ण प्रकार केवळ धक्कादायक नाही तर अत्यंत धोकादायकही आहे. कोणत्याही क्षणी एखादे वेगवान वाहन तिथून जाऊ शकले असते आणि मोठा अपघात घडू शकला असता. मात्र, व्हिडीओमध्ये या जोखमीकडे कोणाचेही लक्ष गेल्याचे दिसत नाही. फक्त प्रसिद्ध आणि लाईक्स मिळवण्यासाठी या दोघींनी जीव धोक्यात टाकल्याचं दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @PremSahab1 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी व्हिडीओला लाईक केले असून त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यामध्ये एका युजरने लिहिले, हायवेवर नागमणी मिळणार नाही दीदी. तर दुसऱ्याने चिंता व्यक्त करत लिहिले, नागिनला कुठले वाहन सपाट करून जाऊ नये, एवढीच प्रार्थना. आणखी एका युजरने म्हटले, आज नागमणी घेऊनच जाणार असं दिसतंय.

कारवाईची मागणी

हा व्हिडीओ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही तर तो सोशल मीडियासाठी धोकादायक स्टंट करण्याची वाढती प्रवृत्ती अधोरेखित करतो. अशा प्रकारांमुळे केवळ त्या व्यक्तीचाच नाही तर वाहनचालकांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून कठोर कारवाईची मागणी केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळण्यावर आळा बसावा अशी देखील मागणी करण्यात येत आहे.