AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चमत्कार की योगायोग? हनुमान मंदिराजवळ अचानक वानरांची गर्दी; उज्जैनमध्ये नेमकं काय घडलं?

Ujjain Khade Hanuman Idol : उज्जेन शहर सध्या सर्वत्र चर्चेत आहे. कारण 170 वर्ष जुनी हनुमान मूर्ती हटवण्यासाठी इंजिनिअर आले पण ते शक्त झालं नाही. असं असताना मंदिर परिसरात अचानक वानरांची गर्दी झाली... म्हणून हा चमत्कार आहे की योगायोग असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चमत्कार की योगायोग? हनुमान मंदिराजवळ अचानक वानरांची गर्दी; उज्जैनमध्ये नेमकं काय घडलं?
| Updated on: Sep 11, 2026 | 11:59 AM
Share

Ujjain Khade Hanuman Idol : मध्ये प्रदेशातील उज्जेन स्थित ‘खडे हनुमान मंदिरा’च्या मुर्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांकडून अनेक तर्क – वितर्क लावले जात आहे. एकीकडे 170 वर्ष जुनी हनुमान मूर्ती हटवण्यासाठी इंजिनिअर आले पण त्यांचे प्रयत्न फेल ठरले, हनुमानाची मूर्ती इंचभरही हलली नाही, असा दावा भक्त करत आहेत. भक्त याकडे दैवी चमत्कार म्हणून पाहात आहेत. पण प्रशासन या फक्त अफवा असल्याचं सांगितलं आहे. हनुमानाच्या मंदिराचा मुद्दा ताजा असताना, मंदिरात अचानक वानरांची गर्दी जमली. त्याचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरत आहे.

मंदिर परिसरात वानरांची गर्दी चर्चाचा विषय ठरत आहे. मंदिर परिसर आणि जवळपास वानर फिरत असल्यामुळे, भक्तांनी एकच गर्दी केली आहे. सांगायचं झालं तर, मंदिर परिसर आणि आसपासच्या भागात उपस्थित असलेल्या लोकांकडून या वानरांना हनुमानाशी जोडलं जात आहे. मात्र, प्रशासनाने या वानरांबाबत कोणताही अधिकृत दावा केलेला नाही. हे दृश्य पाहण्यासाठी दुसऱ्या राज्यातून देखील लोकं त्याठिकाणी पोहोचत आहेत.

व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय ट्रेंड…

गेल्या चार दिवसांपासून, रस्ता रुंदीकरणाच्या प्रकल्पांतर्गत ‘सती गेट’जवळील मंदिराचा काही भाग हटवण्यात आला असला तरी त्यातील मूर्ती एका तंबूत सुरक्षित आणि अढळ स्थितीत उभी असल्याची चर्चा सोशल मीडियावर सातत्याने रंगली आहे. ती मूर्ती चमत्कारिकरीत्या जागच्या जागी सुरक्षित राहिल्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर मूर्ती सुरक्षित स्थितीत उभी असल्याचे दर्शवणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात फिरत आहेत.

हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, भाविकांची प्रचंड गर्दी त्या ठिकाणी लोटत आहे. मंदिर परिसरातील गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने बॅरिकेड्स लावले आहेत. हनुमानाची मूर्ती सध्या एका तंबूत स्थापित केली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, उज्जैनचे उपविभागीय दंडाधिकारी एल. एन. गर्ग यांनी ‘खडे हनुमान’ यांची मूर्ती हटवण्यासाठी प्रशासनाने अनेकदा प्रयत्न केल्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.

प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, ही मूर्ती हटवण्याबाबत किंवा तिचे स्थलांतर करण्याबाबत आतापर्यंत कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यांनी असं देखील सांगितलं आहे की, सोशल मीडियावर काही दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. ‘खडे हनुमान’ यांच्या मूर्तीशी संबंधित विषय हा उज्जैनमधील नागरिक आणि भाविकांच्या श्रद्धेशी जोडलेला आहे.

Follow Us
सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ...
Atul Save Brother Marhan Case | सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, बड्या नेत्याचा आरोप
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, व्हिडीओ शेअर करत बड्या नेत्याचा आरोप
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!