माधुरी दीक्षितच्या गाण्यावर काकांचे जबरदस्त ठुमके! Video

एक काका डान्स फ्लोअरवर पांढऱ्या रंगाचा शर्ट, मरून स्वेटर आणि पँट घालून पूर्ण एनर्जीने नाचताना दिसत आहेत.

माधुरी दीक्षितच्या गाण्यावर काकांचे जबरदस्त ठुमके! Video
Dance
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 25, 2022 | 11:25 AM

कोणत्याही लग्नात धमाकेदार डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाही तर ते लग्नच जरा अपूर्ण वाटतं. लग्नात नाचल्याशिवाय स्वत:ला रोखू न शकणारी काही माणसं असतात. लग्नात नाचणं ही वेगळीच मजा असते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती माधुरी दीक्षित आणि आमिर खानच्या 1990 मध्ये आलेल्या ‘दिवाना मुझ सा नहीं’ या चित्रपटातील ‘सारे लडको की कर दो शादी, बस एक को कुंवरा रखना’ या गाण्यावर नृत्य करत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक काका डान्स फ्लोअरवर पांढऱ्या रंगाचा शर्ट, मरून स्वेटर आणि पँट घालून पूर्ण एनर्जीने नाचताना दिसत आहेत.

गाणं वाजल्याबरोबर त्याला स्वतःला थांबवता आलं नाही आणि मग तो स्टेजवर येऊन नाचू लागला. तो नाचू लागताच अनेकांनी टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली.

या क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी टाळ्या वाजवून तिचा आत्मविश्वास वाढवला, त्याच्या डान्स मूव्ह्जने पाहुण्यांना आश्चर्याचा धक्का दिला. हा व्हिडिओ @Gulzar_sahab नावाच्या अकाऊंटने ट्विटरवर शेअर केला आहे.

ट्विटरवर या व्हिडिओला आतापर्यंत 26 हजारहून अधिक व्ह्यूज मिळालेत हजारो लोकांनी लाईक केलंय तर, लोकांनी कमेंट बॉक्समध्ये कौतुकाचा वर्षाव केलाय.

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युझरने लिहिले, “व्वा अंकल तुम्ही बवाल केलाय! आणखी एका युझरने लिहिले, ‘अप्रतिम, काय डान्स आहे.’

चौथ्या युझरने मजेत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी डान्स करत नाही, इतका कॉन्फिडन्स असता तर मी आज सिंगल नसतो.’