डोकॅलिटिला सलाम ! का होतेय ही अनोखी लग्नपत्रिका व्हायरल, काय आहे खास त्यात?; पत्रिका पाहून तुम्हीही…

मध्य प्रदेशातील एका जोडप्याने आधार कार्डसारखी दिसणारी अनोखी लग्नपत्रिका तयार केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या लग्नपत्रिकेवर वर-वधूचे फोटो, कुटुंबाची माहिती आणि लग्नाची तारीख आधार कार्डच्या स्वरूपात दिलेली आहे.

डोकॅलिटिला सलाम ! का होतेय ही अनोखी लग्नपत्रिका व्हायरल, काय आहे खास त्यात?; पत्रिका पाहून तुम्हीही...
Unique Wedding Card Design
| Edited By: | Updated on: Dec 15, 2024 | 10:10 PM

आता लग्नसराईचे दिवस आहेत. अनेक घरात लगीनघाई सुरू आहे. लग्नासाठीचे हॉल बुक झाले आहेत. खाण्याचा मेन्यूही दिला गेला आहे. सर्व काही झालं आहे. लग्नाचं कार्डही छापून झालं आहे. सर्वांना आवडेल, कार्ड पाहून सर्वचजण प्रभावित होतील, असं कार्ड अनेकजण बनवत असतात. काही लोक मात्र लग्नात हटके आणि यूनिक कार्ड बनवतात. त्यामुळे पाहणाऱ्यांलाही आश्चर्यचकित व्हायला होते. हवं तर अशा प्रकारचे कार्ड सोशल मीडियावर पोस्ट केल्यास ते लवकरच व्हायरल होतात. लग्नाच्या कार्डावर लिहिलेली प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते, कारण पाहणारे प्रत्येक छोटी मोठी गोष्ट लक्षपूर्वक वाचतात, ती बाहेर असो किंवा आतली.

सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट लग्नपत्रिका व्हायरल झाली आहे. ही लग्नपत्रिका आधार कार्ड ( Aadhaar Card Wedding Card Viral ) सारखी दिसते. ही लग्नपत्रिका पाहून निश्चितपणे अनेकांना नवीन आधार कार्ड आलं की काय असं वाटेल. एवढंच कशाला ही लग्नपत्रिका आहे हे ओळखायलाच समोरच्या पाच मिनिटं तरी जातील. कारण ही लग्नपत्रिका पाहिल्यावर आपण आधारकार्डच पाहत आहोत असं वाटतं. ही अनोखी आणि हटके लग्नपत्रिका पाहून लोक नुसते पोट धरून हसत आहेत. तर काही लोक डोकॅलिटीलाही दाद देत आहेत.

लोक गोंधळले

डीके सरदाना (@dksardana) या ट्विटर हँडलवर ही लग्नपत्रिका अपलोड करण्यात आलेली आहे. आधी लोकांनी या लग्नपत्रिकेकडे दुर्लक्ष केलं. कारण आधार कार्ड पोस्ट केल्याचं अनेकांना वाटलं. पण पोस्टवरील कमेंट वाढल्याने इतरांनीही निरखून लग्नपत्रिका पाहिली आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. सध्या लोक लग्नाच्या कार्ड्ससाठी अनेक प्रयोग करत आहेत आणि अशा वेगळ्या डिझाईन्स व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला असेच एक वेगळं कार्ड दाखवलं होतं. अशा कार्ड्सवर सोशल मीडियावर चर्चासत्र सुरू होते आणि लोक त्यांना आवडत आहेत.

घरी धडकली अनोखी लग्नपत्रिका

या लग्नपत्रिकेवर वर “शुभ विवाह” असं लिहिलं आहे. खाली वर आणि वधूच्या कुटुंबाच्या नावांची यादी दिली आहे. नवरदेवाचे नाव प्रह्लाद आणि नवरीचे नाव वर्षा आहे, दोघेही मध्य प्रदेशातील पिपरिया गावातील रहिवासी आहेत. आधार कार्ड क्रमांकाच्या ठिकाणी त्यांचा लग्नाची तारीख 22 जून 2017 लिहिली आहे. लग्नपत्रिकेवर दोघांचे फोटो देखील आहेत. त्याचबरोबर कार्डावर क्यूआर कोड आणि बार कोड देखील आहेत. नातेवाईकांना आहेर करण्यास सोप्पं जावं म्हणून त्यांनी ही आयडिया केली आहे. 2017मधली ही लग्नपत्रिका असली तरी एकदा पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.