Video: ‘स्प्लेंडर’चा ‘ब्लेंडर’ म्हणून वापर, भुईमूग मुळापासून वेगळा करण्यासाठी बळीराजाचा अनोखा जुगाड

भुईमुगाच्या मूळापासून शेंगा वेगळ्या करण्यासाठी या भावाने थेट स्प्लेंडरचा वापर केला आहे.

Video: स्प्लेंडरचा ब्लेंडर म्हणून वापर, भुईमूग मुळापासून वेगळा करण्यासाठी बळीराजाचा अनोखा जुगाड
भुईमूग मुळापासून वेगळं करण्यासाठी स्प्लेंडर बाईकचा वापर
| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 11:24 AM

भारतात ‘जुगाड टेक्नॉलॉजी’चा जितका वापर केला जातो तितका इतर कोणत्याही देशात क्वचितच केला जात असेल. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात, लोक त्यांच्या सोयीनुसार नवनवीन जुगाड करतच असतात. ज्यांचे मजेदार व्हिडिओ दररोज इंटरनेटवर व्हायरल होतात. सध्या असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर चांगले शास्त्रज्ञही स्तब्ध होतील. ( Use a bike to separate the peanuts from the roots. Farmer’s desi jugaad )

व्हायरल व्हिडिओमध्ये, एक शेतकरी आपले काम सोपं करण्यासाठी देसी जुगाडचा अवलंब करत आहे. भुईमुगाच्या मूळापासून शेंगा वेगळ्या करण्यासाठी या भावाने थेट स्प्लेंडरचा वापर केला आहे. हो तीच स्प्लेंडर गावाकडं जी शेतकरी सर्रास वापरतात. स्प्लेंडर बाईक डबल स्टॅडवर लावून, गाडी गिअरमध्ये टाकून मागंचं चाक फिरवलं जात आहे, आणि या चाकांच्या स्पोक्समध्ये काढणी झालेल्या भुईमूगाची मुळं टाकली जातात, जोरात फिरणाऱ्या स्पोक्समध्ये मुळाला लागलेल्या शेंगा फसतात, आणि त्या मुळांपासून वेगळ्या होतात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शेतकऱ्याने बाईक सुरू केली आहे आणि त्याचा मागील टायर हवेत आहे. ज्यामुळे चाक हवेतच फिरताना दिसतंय आणि त्यांच्यामध्ये मुळं टाकल्यानंतर शेंगा तर वेगळ्या होतच आहे, शिवाय मातीही बाहेर फेकली जाते.

व्हिडिओ पाहा:

सोशल मीडियावरील नेटकऱ्यांना हा जुगाड खूप आवडला आहे. अनेकांनी यावर मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिलं, ‘खरोखर शेतकरी भावाचा हा जुगाड आश्चर्यकारक आहे. त्याचवेळी, दुसऱ्याने लिहिले, ‘जुगाड तंत्रज्ञानाचा उत्तम वापर.’ अजून एका नेटकऱ्याने लिहिले, ‘देसी जुगाड जिंदाबाद.’ याशिवाय अनेकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. जुगाड लाईफ हॅक्सच्या अकाउंटवरुन इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. शेतकऱ्याचा हा जुगाड तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा.

हेही पाहा:

Video: वडिलांनी वाहतुकीचा नियम मोडला, आणि मुलगी चिडली, सूरत पोलिसांकडून अनोखा व्हिडीओ शेअर

Video: ‘मणिके मगे हिते’ चं बासरी व्हर्जन ऐकलंय? नेटकऱ्यांकडून बासरी व्हर्जनला तुफान प्रतिसाद