Video: ‘मणिके मगे हिते’ चं बासरी व्हर्जन ऐकलंय? नेटकऱ्यांकडून बासरी व्हर्जनला तुफान प्रतिसाद

आता बासरी वादक नवीन कुमार यांनीही याचं एक व्हर्जन तयार केलं आहे. त्यांनी बासरीच्या माध्यमातून 'मणिके मगे हिते' या गाण्याची सुमधूर धून वाजवली आहे. ही धून ऐकूणच लोक मंत्रमुग्ध झाले आहेत.

Video: 'मणिके मगे हिते' चं बासरी व्हर्जन ऐकलंय? नेटकऱ्यांकडून बासरी व्हर्जनला तुफान प्रतिसाद
बासरी वादक नवीन कुमार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

‘मणिके मॅगे हिते’ या गाण्याने गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर धूम माजवली आहे. हे हिट श्रीलंकन ​​गाणं गायिका योहानी डी सिल्वा यांनी गायलं आहे. लोक त्याच्या आवाजाचे अक्षरष: वेडे झाले आहेत. या गाण्याची जादू लोकांच्या डोक्यावर चढलेली पाहायला मिळते. याच कारणामुळे सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर या गाण्याच्या वेगवेगळ्या व्हर्जन्सचा पूर आलेला दिसतो आहे. आता बासरी वादक नवीन कुमार यांनीही याचं एक व्हर्जन तयार केलं आहे. त्यांनी बासरीच्या माध्यमातून ‘मणिके मगे हिते’ या गाण्याची सुमधूर धून वाजवली आहे. ही धून ऐकूणच लोक मंत्रमुग्ध झाले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.( The flute version of Yohnny de Silva’s song Manike Mage Hithe is viral)

बासरी वादक नवीन कुमार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, मणिके मगे हिते. तुमच्यापैकी अनेकांनी मला गायक योहानीचे हे सुंदर श्रीलंकन ​​गाणे ऐकायला सांगितले आहे. लोकांच्या मागणीनुसार, तुमच्यासाठी गाण्याची बासरी व्हर्जन मी तयार केली आहे.

पाहा व्हिडीओ:

इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ सुमारे 15 हजार वेळा पाहिला गेला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक त्यावर सतत आपला अभिप्राय देत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले, मी दक्षिण श्रीलंकेचा आहे. मणिके मगे हितेची हे व्हर्जन ऐकून खूप छान वाटलं. त्याच वेळी, दुसऱ्याने लिहिले आहे, श्रीलंकेकडून शुभेच्छा स्वीकारा, सर. आमच्या राष्ट्रगीताचा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद.

हेही वाचा:

Video: पाण्याने भरलेली बाटली, त्यावर अंड, नवऱ्याचा बायकोसोबत प्रँक पाहून नेटकरी लोटपोट

Video: डान्स करणाऱ्या भावाने, अशी काही उडी मारली की लग्नाचा मांडवच फाडला, व्हिडीओ व्हायरल

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI