Video: डान्स करणाऱ्या भावाने, अशी काही उडी मारली की लग्नाचा मांडवच फाडला, व्हिडीओ व्हायरल

लग्नात नाचणारा हा मुलगा लग्नमंडपात फसतो आणि तोंडावर आपटतो.

Video: डान्स करणाऱ्या भावाने, अशी काही उडी मारली की लग्नाचा मांडवच फाडला, व्हिडीओ व्हायरल
डान्स करताना हा मुलगा फ्लिप मारतो, आणि त्यातच तो मंडपात अडकतो.

सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लग्न समारंभाचे विविध व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहिल्यानंतर तुम्ही हसू आवरु शकत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा स्टेजवर डान्स करताना दिसतो आहे, पण काहीच वेळात त्याच्यासोबत असं काही घडतं, की ते पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरुन हसाल. ( Wedding Dance Video Goes Viral. The dancer got stuck in the wedding tent and fell on his face.)

सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लग्नातील विविध व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यात डान्स, गाणं आणि वेगवेगळ्या जुगाडांचे व्हिडीओ असतात. त्यातील डान्सचे व्हिडीओ पाहणं लोकांना जास्त आवडतं, अशाच लग्नातील व्हिडीओंमुळे लोक एका रात्रीत स्टार बनले आहेत, असाच एक डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही.

काही सेकंदाचा हा व्हिडीओ आहे, ज्यात 2 मुलं स्टेजवर नाचताना दिसतात. दरम्यान एक मुलगा त्याचं डान्सिंग टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्यानंतर जे झालं, त्याचा अंदाज डान्स करणाऱ्या मुलालाही लागला नाही. हा मुलगा लग्नमंडपात फसतो आणि तोंडावर आपटतो. डान्स करताना हा मुलगा फ्लिप मारतो, आणि त्यातच तो मंडपात अडकतो.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर official_viralclips नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. इन्स्टाग्राम युजर्सला हा व्हिडीओ चांगलाच आवडलेला दिसतो आहे. या व्हिडीओला तब्बल 3 हजार लोकांनी लाईक केलं आहे. अजूनही लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोहचत आहे. लोक या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली ही, भावा, मांडवाने तुझं काय वाकडं केलं होतं. तर दुसऱ्याने लिंहलं, भावा, मांडवच फाडला रे. अनेकांनी इमोजीजमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

हेही पाहा:

Video : बसवर टस्कर हत्तीचा हल्ला, पण चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले, थरकाप उडवणारा व्हायरल व्हिडीओ

हर्षल पटेलच्या हॅट्रीकने मुंबई इंडियन्सचा खेळ बिघडला, RCB जिंकल्यानंतर फॅन्सकडून मुंबईची खिल्ली, इंटरनेटवर मजेशीर Memes व्हायरल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI