Video: पाण्याने भरलेली बाटली, त्यावर अंड, नवऱ्याचा बायकोसोबत प्रँक पाहून नेटकरी लोटपोट

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 27, 2021 | 3:17 PM

सध्या सोशल मीडियावर प्रँकचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसतात. यामुळेच प्रँक व्हिडीओ बनवण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. कधीकधी काही लोक असे प्रँक करतात, ज्यामुळे राग देखील येतो

Video: पाण्याने भरलेली बाटली, त्यावर अंड, नवऱ्याचा बायकोसोबत प्रँक पाहून नेटकरी लोटपोट
नवरा बायकोच्या प्रँकचा व्हिडीओ व्हायरल होत आहे
Follow us

सध्या सोशल मीडियावर प्रँकचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसतात. यामुळेच प्रँक व्हिडीओ बनवण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. कधीकधी काही लोक असे प्रँक करतात, ज्यामुळे राग देखील येतो तर काही प्रँक व्हिडिओ आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्ही विचारात पडता. सध्याला सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहल्यानंतर तुम्हाला वाटेल की प्रँकपासून दूरच राहणं चांगलं. (Prank the eggs on the bottle. Husband wife prank video)

व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये आपण पाहू शकता की, एक जोडपं स्वयंपाक घरात उभं आहे. इथं टेबलावर पाण्याची बाटली ठेवलेली दिसते आहे. पती बाटलीवर अंडी ठेवतो. मग एका हाताने बाटली आणि दुसऱ्या हाताने अंडी धरतो. यानंतर तो अंडी लपवतो. बायको बाटलीच्या आत पाहताच अचानक पती बाटली दाबतो आणि त्याचे सर्व पाणी त्या महिलेच्या तोंडावर येते. असा प्रँक पाहून कुणालाही राग येऊ शकतो.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

हा प्रँक व्हिडिओ इंस्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. पोस्ट करणाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कुणीतरी आहे जो नुकताच आंघोळ करून बाहेर आला आहे.’ काही दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ सुमारे तीन हजार लोकांनी लाईक केला आहे. ही संख्या सतत वाढत आहे. व्हिडीओवर सध्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनेकांनी इमोजीजद्वारे आपलं मत व्यक्त केलं आहे.

हेही पाहा:

Video: डान्स करणाऱ्या भावाने, अशी काही उडी मारली की लग्नाचा मांडवच फाडला, व्हिडीओ व्हायरल

Video : बसवर टस्कर हत्तीचा हल्ला, पण चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले, थरकाप उडवणारा व्हायरल व्हिडीओ

 

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI