लग्न सोहळ्याचं शहनाई वादन चाललेलं, त्याचवेळी जावयाने सासूला घरामागच्या शेतात नेलं..दोघांचं असं सिक्रेट बाहेर आलं सगळेच हडबडले

दुपारची वेळ होती. म्हणून सासूला घराच्या मागे शेतात मेहंदी तोडण्याच्या बहाण्याने बोलावलं. कुटुंबियांना जराही संशय आला नाही. बराच वेळ झाला तरी सासू आणि जावई शेतातून परतले नव्हते.

लग्न सोहळ्याचं शहनाई वादन चाललेलं, त्याचवेळी जावयाने सासूला घरामागच्या शेतात नेलं..दोघांचं असं सिक्रेट बाहेर आलं सगळेच हडबडले
Love Affair
Image Credit source: Google Gemini
| Updated on: May 09, 2026 | 2:20 PM

समाजात काही नाती ही विश्वास आणि आदर या पायावर टिकून असतात. कुठल्याही नात्यामध्ये माणसाने मर्यादा पाळायची असते. त्याचा विसर पडला की, होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. क्षणिक सुखासाठी माणूस अनेकांचं आयुष्य उद्धवस्त करतो. अनेक मनांना वेदना देतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या आगरा जिल्ह्यात अछनेरा क्षेत्रात घडली आहे. नात्यांवरचा विश्वास उडेल, लाज वाटावी असं हे प्रकरण आहे. या प्रकरणात सासूला आपल्या जबाबदारीचा विसर पडला. तिने सर्व मर्यादा सोडून दिल्या. मुलीचा नवरा म्हणजे जावयासोबतच पळून गेली. गावात एका लग्न सोहळ्याच उत्साह होता. शहनाई वादन सुरु होतं. या दरम्यान जावई आपल्या सासरी आला. जावई पाच मुलांचा पिता आहे.

दुपारची वेळ होती. म्हणून सासूला घराच्या मागे शेतात मेहंदी तोडण्याच्या बहाण्याने बोलावलं. काहीतरी वाईट घडणार आहे, याचा कुटुंबियांना जराही संशय आला नाही. बराच वेळ झाला तरी सासू आणि जावई शेतातून परतले नाहीत. म्हणून काही नातेवाईक शेताकडे गेले. तिथलं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सासू आणि जावयाला त्यांनी नको त्या अवस्थेत पाहिलं. एकच आरडोओरडा, गदारोळ सुरु झाला. जावई आणि सासू लगेच तिथे असलेल्या बाईकवर बसून पसार झाले.

आग विझलेली नव्हती

महत्वाचं म्हणजे कुटुंबियांना दोघांमधल्या अफेअर बद्दल समजण्याची पहिली वेळ नाही. या नात्यातला कडवटपणा 12 वर्षापूर्वीचा आहे. दोन सख्ख्या भावांचं लग्न दोन सख्ख्या बहिणींसोबत झालं. लग्नाच्या तीन वर्षानंतर मोठ्या जावयाची सासू सोबत जवळीक वाढली. 12 वर्षांपूर्वी सुद्धा दोघे समाजाच्या बेड्या तोडून पळून गेले होते. त्यावेळी त्यांना दिल्लीतून शोधून परत आणण्यात आलं. लोकलाजेस्तव विषय शांत करण्यात आला. पण आग विझलेली नव्हती. पुन्हा एकदा दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं. हे अनैतिक संबंधांच प्रकरण दोन्ही कुटुंबांची फक्त बदनामी करणारं आहे. यामुळे जवळच्या माणसांच्या डोळ्यात अश्रू आहेत. महिलेच्या पतीला शॉक बसला असून जावयाच्या पत्नीची सुद्धा वाईट अवस्था आहे.

Follow Us