AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : जर घरातीलच व्यक्ती शत्रू असेल तर काय करायचं? चाणक्यांचा हा सल्ला येईल तुमच्या कामी

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य म्हणतात बाहेरच्या शत्रूपेक्षा माणसाला घरातील शत्रूचा मोठा धोका असतो. कारण बाहेरचा शत्रू आपल्याला माहीत असल्याने आपण त्याच्यापासून नेहमी सावध राहतो. परंतु आपल्याला आपला घरातील शत्रू माहीत नसतो आणि तिथेच आपला घात होतो.

Chanakya Niti : जर घरातीलच व्यक्ती शत्रू असेल तर काय करायचं? चाणक्यांचा हा सल्ला येईल तुमच्या कामी
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 13, 2026 | 9:47 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाच्या शत्रूंचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत, तसेच त्यांच्यापासून बचाव कसा करायचा? सावध कसं राहायचं? शत्रूंचा बिमोड कसा करायचा? याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणूस जेव्हा प्रगती करू लागतो, आपल्या क्षेत्रामध्ये नाव कमावतो, तेव्हा त्याला शत्रू निर्माण होऊ लागतात. शत्रूचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे बाहेरचे शत्रू, जे आपले थेट शत्रू असतात. अशा शत्रूंसोबत लढणं हे सोपं असतं. कारण आपल्याला हे माहीत असतं की समोरचा व्यक्ती आपला शत्रू आहे. मात्र दुसरे जे शत्रू असतात हे बाहेरच्या शत्रूंपेक्षा खूप खरतनाक असतात. इथे तुम्हाला हेच माहीत नसतं की आपला शत्रू कोण आणि मित्र कोण? हे शत्रू दुसरे तिसरे कोणी नसून तुमच्याच घरातील कुटुंबातील व्यक्ती असतात. त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्यापासून सावध राहण्यासाठी तुमची कसोटी लागते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, तसेच या शत्रूंपासून बचाव कसा करायचा याची माहिती देखील चाणक्य यांनी दिली आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संयम -चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा तुम्ही तुमचं नियंत्रण गमावता. रागाच्या भरात तुम्ही अशा काही गोष्टी बोलून जातात की समरोचा व्यक्ती तुमचा शत्रू बनतो. लक्षात ठेवा एकवेळी मारलेली जखम नीट होते, परंतु तुम्ही तुमच्या जीभेनं जी जखम करतात ती कधीही नीट होत नाही. ती कायम मनावर तशीच कोरलेली असते. तुमच्या बोलण्यामुळेच घरातील एखादी व्यक्ती तुमचा शत्रू होऊ शकते, त्यामुळे तुम्ही कायम संयम ठेवला पाहिजे. नेहमी विचारपूर्वकच बोललं पाहिजे.

योजना गुप्त ठेवा – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला असा संशय असतो की घरातीलच एखादी व्यक्ती तुमचा शत्रू आहे, तेव्हा अशावेळी विशेष काळजी घ्या. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी ज्या योजना बनवल्या आहेत. त्या अशावेळी कोणालाही सांगू नका. त्या फक्त तुमच्यापुरतत्याच मर्यादीत ठेवा. जर या योजना तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगितल्या आणि तोच जर तुमचा शत्रू असेल तर त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

थेट आरोप करू नका – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला असा संशय असतो की तुमच्या घरातीलच कोणीतरी तुमचा शत्रू आहे, तेव्हा अशावेळी थेट आरोप करणं टाळा, त्याऐवजी आधी पुरावे गोळा करा, यामुळे तुमच्या आरोपांना आधार मिळतो, आणि घरातील इतर व्यक्तीही तुमच्यावर विश्वास ठेवतात, असा सल्ला चाणक्य यांनी दिला.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...