असं कुठे होतं का? एक नवरा दोन बायका, अखेर गावच्या पंचायतीने दोन बायकांमध्ये नवऱ्याची अशी केली वाटणी

मुस्लिम समुदायातील एका युवकाने दोन लग्न केली. पहिलं लग्न अरेंज मॅरेजद्वारे झालं होतं. दुसऱ्या पत्नीसोबत युवकाने लव्ह मॅरेज केलं. सुरुवातीला सर्वकाही व्यवस्थित होतं. पण हळूहळू दोघींमध्ये नवरा आपल्याकडेच राहिला पाहिजे म्हणून वादविवाद सुरु झाले.

असं कुठे होतं का? एक नवरा दोन बायका, अखेर गावच्या पंचायतीने दोन बायकांमध्ये नवऱ्याची अशी केली वाटणी
Husband-Wife Matter
| Updated on: Jan 22, 2026 | 2:03 PM

उत्तर प्रदेशच्या रामपुरमधील एक प्रकरण समोर आलय. ते ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणालं असं कुठे होतं का? एका म्यानात दोन तलवारी कशा राहू शकतात? असाच तो विषय आहे. अखेर पंचायतीने यावर काढलेला तोडगा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. दोन बायकांच एकच नवरा त्याच्या विभागणीचा हा विषय आहे. त्याच्यासाठी आठवड्याभराच लिखित शेड्यूल तयार करण्यात आलय. अजीमनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील नगलिया अकिल गावचा हा विषय आहे. मुस्लिम समुदायातील एका युवकाने दोन लग्न केली. पहिलं लग्न अरेंज मॅरेजद्वारे झालं होतं. दुसऱ्या पत्नीसोबत युवकाने लव्ह मॅरेज केलं. सुरुवातीला सर्वकाही व्यवस्थित होतं. पण हळूहळू दोघींमध्ये नवरा आपल्याकडेच राहिला पाहिजे म्हणून वादविवाद सुरु झाले. वाद इतका वाढला की घरातली सुखशांती हरवून गेली. प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं.

पोलिसांपर्यंत तक्रार गेल्यानंतर प्रकरण सामाजिक स्तरावर सोडवण्यासाठी गावाची पंचायत बोलवण्यात आली. पंचांनी दोन्ही पती आणि पतीची बाजू ऐकली. वाद संपवण्यासाठी पंचायतीने पतीची दिवसांमध्ये वाटणी करण्याचा फॉर्म्युला शोधला.

सोमवार, मंगळवार, बुधवार असे तीन दिवस पती पहिल्या पत्नीसोबत राहिलं.

गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहणार.

रविवारचा दिवस पतीसाठी असेल. रविवारची त्याला सुट्टी देण्यात आली. या दिवशी तो दोन्ही पत्नींपासून लांब राहून एकांतात आपला वेळ घालवू शकेल.

काही खास परिस्थितीत एखाददिवस मागे-पुढे करण्याची मुभा पंचायतीने दिली आहे. भविष्यात यावरुन वाद होऊ नये यासाठी करार लिखितमध्ये करुन तिघांची स्वाक्षरी घेण्यात आली आहे.

पतीच्या वाटणीचं हे काही पहिलं प्रकरण नाही. याआधी बिहारच्या पूर्णियामध्ये सुद्धा अशाच प्रकरणाची चर्चा होती. तिथे एका युवकाने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय दुसरं लग्न केलं होतं. वाद वाढल्यानंतर दोन्ही पत्नींमध्ये आठवड्याची विभागणी करण्यात आली.