Video : लष्करी जवानाच्या सतर्कतेमुळे वाचला दोन तरूणींचा जीव, वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून केली सुटका…

| Updated on: Apr 30, 2022 | 3:13 PM

उत्तराखंडमधील ऋषिकेशमधल्या फूल छत्ती इथे आज दोन मुली पाण्यात बु़डत असताना भारतीय लष्कराच्या जवानाने त्यांचे प्राण वाचवलेत. भारतीय लष्कराच्या राफ्टिंग टीमच्या एका सदस्याने या दोन मुलींची सुटका केली.

Video : लष्करी जवानाच्या सतर्कतेमुळे वाचला दोन तरूणींचा जीव, वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून केली सुटका...
Follow us on

उत्तराखंड : उत्तराखंडमधल्या ऋषिकेशमधला एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.उत्तराखंडमधील ऋषिकेशमधल्या फूल छत्ती इथे आज दोन मुली पाण्यात बु़डत असताना भारतीय लष्कराच्या जवानाने त्यांचे प्राण वाचवलेत. भारतीय लष्कराच्या राफ्टिंग टीमच्या एका सदस्याने या दोन मुलींची सुटका केली. या मुली तराफ्यावरून पडल्या आणि त्यांना वेळीच मदत मिळाली नसती तर अनर्थ झाला असता पण या जवानाच्या सतर्कतेमुळे या दोघींचे प्राण वाचलेत. या बचावकार्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

त्या दोघींचा थोडक्यात जीव वाचला

उत्तराखंडमधील ऋषिकेशमधल्या फूल छत्ती इथे आज दोन मुली पाण्यात बु़डत असताना भारतीय लष्कराच्या जवानाने त्यांचे प्राण वाचवलेत. भारतीय लष्कराच्या राफ्टिंग टीमच्या एका सदस्याने या दोन मुलींची सुटका केली. या मुली तराफ्यावरून पडल्या आणि त्यांना वेळीच मदत मिळाली नसती तर अनर्थ झाला असता पण या जवानाच्या सतर्कतेमुळे या दोघींचे प्राण वाचलेत.

ऋषिकेशमधील फूल छत्ती इथे आज भारतीय लष्कराच्या राफ्टिंग टीमच्या एका सदस्याने दोन नागरी मुलींची सुटका केली. या मुली नागरी तराफ्यावरून पडल्या. त्यांना वेळीच मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचल्याचं भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याकडून ,सांगण्यात आलं आहे.

भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. “लष्कराच्या राफ्टिंग टीमच्या एका सदस्याने आज ऋषिकेशमधील फूल छत्ती भागात दोन मुलींना नदीत बुडण्यापासून वाचवले. या मुली बोटीतून पाण्याच्या प्रवाहात पडल्या होत्या”, या अधिकाऱ्याने सांगितलं.

याआधी मंगळवारी ऋषिकेशमध्ये गंगा नदीत स्नान करताना दिल्लीतील एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला होता. अंकुश जोस असं या पर्यटकाचं नाव आहे. तो पूर्व दिल्लीतील गोकुळपुरीचा रहिवासी होता. एसडीआरएफच्या जवानांती काही तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर 25 फूट खोल पाण्यातला मृतदेह बाहेर काढला होता.