Vande Bharat ट्रेनच्या जेवणामुळे सुजले ओठ ? महिलेच्या दाव्यामुळे खळबळ

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिलेल्या जेवणामुळे तिला बराच त्रास झाला, ॲलर्जी झाली आणि दोन वर्षांच्या मुलाला जुलाब झाले, असा दावा एका महिलेने केला आहे. या महिलेने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला असून आयआरसीटीसीने (IRCTC) यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Vande Bharat ट्रेनच्या जेवणामुळे सुजले ओठ ? महिलेच्या दाव्यामुळे खळबळ
वंदे भारतचं जेवण पुन्हा चर्चेत
| Updated on: Apr 01, 2026 | 1:16 PM

देशातील प्रीमिअम ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) ही अन्नाच्या दर्जामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली असून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. वाराणसीहून देवघरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या आयुषी सिंग नावाची महिला आणि तिचा दोन वर्षांचा मुलगा, हे ट्रेनमधील जेवण खाल्ल्यानंतर आजारी पडले, असा दावा करण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेचे फोटो आणि वैद्यकीय अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

27 मार्च रोजी 22500 या ट्रेनच्या कोच ई1 मधून आयुषी तिच्या कुटुंबियांसह प्रवास करत होती. मात्र या ट्रेनमध्ये जे जेवण देण्यात आलं, ते खाल्ल्यावर थोड्याच वेळात तिला ॲलर्जी झाली आणि तिचे ओठ खूप सुजले, असा आरोप तिने केला आहे. तर माझ्या मुलाला जुलाब होऊ लागले, असंही तिने म्हटलं. एवढंच नव्हे तर ट्रेनमध्ये देण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याबद्दलही तिने अनेक सवाल उपस्थित केले आहेत. जर आम्हाला वेळेवर उपचार मिळाले नसते तर परिस्थिती आणखी बिघडू शकली असती, असा दावा आयुषीने केला आहे.

या पोस्टमुळे माजली खळबळ

IRCTC चं म्हणणं काय ?

मात्र त्या महिलेचा वैद्यकीय अहवाल आणि तिच्या सुजलेल्या ओठांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, आयआरसीटीसीने (IRCTC) यावर आता प्रतिक्रिया दिला आहे. त्या दिवशी जे अन्न देण्यात आलं, त्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता ते सुरक्षित असल्याचे आढळलं, असा दावा आयआरसीटीसीने केला आहे. तसेच, ट्रेनमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. आयआरसीटीसीने महिला प्रवाशाशी संपर्क साधला असून, संपूर्ण माहिती मागवली असून सखोल चौकशीचे आश्वासनही दिलं आहे.

महिलेचा मेडिकल रिपोर्ट

IRCTC चं उत्तर

 

 

Follow Us