Video : 10 वर्षांचा सोबती हरवला! पोपटाच्या शोधासाठी गल्लीबोळांत पोस्टर, हजारोंच बक्षीस केले जाहीर

10 वर्ष घरात राहिलेला पोपट अचानक गायब झाल्याने संपूर्ण कुटुंब निराश झाले आहे. त्यांचा पोपट सुखरूप घरी परत यावा यासाठी त्यांनी त्याचे पोस्टर गल्लीबोळाच चिपकवले आहे, त्यासोबतच त्यावर मोठे बक्षीस देखील ठेवले आहे.

Video : 10 वर्षांचा सोबती हरवला! पोपटाच्या शोधासाठी गल्लीबोळांत पोस्टर,  हजारोंच बक्षीस केले जाहीर
viral video
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 22, 2026 | 6:14 PM

कोणताही प्राणी पाळला की त्याची सवय होते, तो फक्त प्राणी राहत नाही तर कुटुंबातील सदस्यच बनतो. त्याची सवय होते. त्याच्या आवाजाने घर गजबजतं आणि तो नसला तर संपूर्ण घर शांत होतं. पण असाच दहा वर्षांचा सोबती अचानक घरातून उडून गेलाय, होय उडून गेलाय. एका कुटुंबाचा लाडका पाळलेला पोपट अॅलेक्स बेपत्ता झाला आहे. त्याला शोधण्यासाठीस कुटुंबाने चक्क काशीच्या गल्लीबोळांत पोस्टर लावले असून त्याला सुरक्षित आणणाऱ्यांना 11,००० रूपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे.

घरातून उडून गेलाच कसा

वाराणसीच्या दारानगर परिसरात अरविंद मौर्य यांच कुटुंब राहतं. जवळपास 10 वर्षांपूर्वी त्यांनी अॅलेक्स नावाचा पोपट पाळला. इतक्या वर्षांनी तो घरातील प्रत्येकाशी चांगलाच रूळला होता. घरात त्याची सततची वर्दळ, आवाज आणि खेळकरपणा यामुळे वातावरण आनंदी राहायचं

Loading...

मात्र 16 नोव्हेंबरला घरात टाईल्स बसवण्याचं काम सुरू होतं. यासाठी मशीनचा मोठा आवाज होत होता. या आवाजाने अॅलेक्स घाबरला आणि घरातून उडून गेला. सुरूवातीला कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. शेजाऱ्यांकडे चौकशी केली. पण कुठेही त्याचा पत्ता लागला नाही.

काशीच्या गल्लीबोळांत अॅलेक्सचे पोस्टर

अॅलेक्सचा शोध घेण्यासाठी अरविंद मौर्य, त्यांचे मुलगे आणि कुटुंबातील इतर सदस्य़ आता वाराणसीच्या वेगवेगळ्या भागांत फिरत आहेत. त्यांनी अॅलेक्सचा फोटो असलेले पोस्टर लावले आहेत. त्यांनी अॅलेक्सचा फोटो असलेले पोस्टर लावले आहेत. या पोस्टरवर त्याला शोधून सुरक्षित घरी आणणऱ्या व्यक्तीला 11 हजार रूपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

अॅलेक्स गेल्याने घरातील कुत्राही उदास

या सगळ्यात आणखी एक भावूक करणारी गोष्ट म्हणजे घरातील कुत्राही उदास झाला आहे. घरातील कुत्रा सतत अॅलेक्ससोबत खेळत असायचा, त्यांची छान मैत्री जमली होती. मात्र त्याच्या जाण्याने तो उदास झाला आहे.

11,000 रूपयांचे बक्षीस

यावेळी कुटुंबाने 11,000 रूपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तरीही अॅलेक्स सापडला नाही. तर ही रक्कम वाढवून 21, 000 केली जाणार आहे. त्याशिवाय भेटवस्तूही देण्यात येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us