Video : शेतात शिरला बिबट्या, धाडसी शेतकऱ्याने आरामात मोबाईलने सेल्फी काढला..अन्

अलिकडेच सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओ खूप मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ माहिती देणारे देखील असतात. बिबट्यांचा शेत आणि घरात उपद्रव सुरु असतानाच बिबट्याचा एक खतरनाक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Video : शेतात शिरला बिबट्या, धाडसी शेतकऱ्याने आरामात मोबाईलने सेल्फी काढला..अन्
Leopard entered the field
| Updated on: Feb 27, 2026 | 6:55 PM

मोबाईल सेल्फीचा नाद एव्हाना अबालवृद्धांना लागला आहे. लोक सेल्फीसाठी कोणतीही जोखीम उचलत आहेत. कधी डोंगराच्या कड्यावरुन चालणे, कधी चालत्या बाईकवरुन स्टन्ट करणे, हायराईज इमारतीच्या टॉपवरुन खतरनाक पोझ देणे आणि किंवा खतरनाक जानवरांच्या सोबत व्हिडीओ तयार करणे. सतत सोशल मीडिया अशा व्हिडीओने भरलेला आहे. असे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.

इंटरनेटवर अलिकडेच एक असाच रिल्स व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती बिबट्याच्या सोबत आरामात सेल्फी घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती या बिबट्याला जराही घाबरताना दिसत नाही. तसेच बिबट्या देखील पाळीव कुत्रा असल्याप्रमाणे या व्यक्तीला बिनधास्त त्याचा व्हिडीओ तयार करु देत आहे. जणू काही या व्यक्तीने या बिबट्याला पाळले असावे असा संशय यावा असा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

बिबट्या त्याच्या शेतात घुसला

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AmazingSights नावाच्या हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर केलेला आहे. यावर कॅप्शनमध्ये भारतातील एक शेतकरी त्याच्या शेतात घुसलेल्या बिबट्यासोबत सेल्फी घेत आहे. हा व्हिडीओ ज्याने शेअर केला त्या व्यक्तीच्या दाव्यानुसार व्हिडीओ शुट करणारा व्यक्ती शेतकरी आहे.जेव्हा बिबट्या त्याच्या शेतात घुसला त्यावेळी त्याने बिनधास्त या बिबट्यासोबत सेल्फी काढल्याचा दावा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याने केला आहे.

बेसिक मॅनर्स !

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की बिबटा आरामात शेतात बसलेला आहे. संबंधित व्यक्ती या बिबट्यावर समोर उभा राहून सेल्फी घेत आहे. हा व्यक्ती अजिबात घाबरत नसल्याने या व्हिडीओची सत्यता अजून स्पष्ट झालेली नाही. या व्हिडीओला अनेक लोकांनी मजेशीर प्रतिक्रीया दिलेल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की बिबट्या त्याचे ऐकत आहे, कारण तो त्याच्या शेतात उभा आहे, बेसिक मॅनर्स !  तर दुसऱ्या एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये ग्रोकला विचारलंय की या व्हिडीओची सत्यता व्हेरीफाय करा. यावर ग्रोकने उत्तर दिलेय की हे असली फुटेज आहे आणि असे वाटतंय की हे बिहारच्या कुठल्या तरी गावातील आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

( डिस्क्लेमर – ही बातमी सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. या व्हिडीओला टीव्ही नाईन मराठी दुजोरा देत नाही. )

 

Follow Us