Video | ‘मैं चली’ गाण्यावर दोन मुलींनी केला जबरदस्त डान्स, पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ…

या व्हिडिओमध्ये दोन मुलींनी अतिशय सुंदर लेहेंगा घातला आहे. या दोघीही अत्यंत मनमोहक आणि सुंदर डान्स करत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही टाळ्या वाजवल्याशिवाय नक्की राहणार नाहीत. या दोघांनीही 'मैं चली' गाण्यावर डान्स केला आहे.

Video | मैं चली गाण्यावर दोन मुलींनी केला जबरदस्त डान्स, पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ...
| Edited By: | Updated on: Aug 11, 2022 | 1:52 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social media) लग्नातील मस्ती आणि डान्सचे व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. भारतात सध्या लग्नसमारंभात डान्स करण्याचा ट्रेंड सुरू आहे. अशा परिस्थितीत नवरदेव नवरीसह लग्नामध्ये नातेवाईकही मोठ्या प्रमाणात डान्स (Dance) करत आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारचा लग्नातील दोन मुलींचा व्हिडीओ (Video) व्हायरल होताना दिसतो आहे. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या दोन मुलींना डान्स पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित आहे. कारण दोन्हीही मुली अत्यंत सुंदर डान्स करताना दिसत आहेत.

इथे पाहा व्हायरल होणारा डान्स व्हिडीओ

दोन मुलींनी लेहेंगा घालून केला जबरदस्त डान्स

या व्हिडिओमध्ये दोन मुलींनी अतिशय सुंदर लेहेंगा घातला आहे. या दोघीही अत्यंत मनमोहक आणि सुंदर डान्स करत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही टाळ्या वाजवल्याशिवाय नक्की राहणार नाहीत. या दोघांनीही ‘मैं चली’ गाण्यावर डान्स केला आहे. दोघींमध्ये आत्मविश्वास भरलेला आहे. अवघ्या काही सेकंदातच त्यांनी आपल्या नृत्याची जादू संपूर्ण मंचावर पसरवली आणि अनेकांची मने जिंकली.

मैं चली गाण्यावरील डान्स सोशल मिडियावर व्हायरल

हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. इतकेच नाही तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. कमेंट सेक्शनमध्येही अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले. काहींनी हार्ट इमोजी पाठवले तर काहींनी फायर इमोजी पोस्ट केले आहेत. मात्र, या दोन मुलींचा डान्सचा व्डिडीओ सोशल मीडियावरती चर्चेचा विषय ठरला असून हा व्हिडीओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल होतो आहे.