Video : होणाऱ्या बायकोच्या एन्ट्रीच्या आनंदात नवरदेवाचा भांगडा, पुढे काय झालं, तुम्हीच पाहा

सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. आता एका वराचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक वर आपल्या लग्नाला खास बनवण्यासाठी वधूच्या प्रवेशाच्या वेळी भांगडा करत आहे.

Video : होणाऱ्या बायकोच्या एन्ट्रीच्या आनंदात नवरदेवाचा भांगडा, पुढे काय झालं, तुम्हीच पाहा
नवरदेवाचा डान्स व्हायरल
| Edited By: | Updated on: Jan 28, 2022 | 7:21 PM

दादासाहेब कारंडे, प्रतिनिधी, मुंबई : सोशल मीडिया (Social Media) हे एक व्यासपीठ आहे जिथे खूप काही पाहायला मिळते. आता लग्नाच्या मोसमात अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, जे येताच इंटरनेटवर व्हायरल होतात. वधूची शानदार एन्ट्री (Wedding Entry) तुम्ही सर्वांनी अनेकदा पाहिली असेल. हा क्षण सर्वांसाठीच महत्वाचा असतो. आता लग्नाचा असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये लोकप्रिय झाला आहे, ज्यामध्ये वधूला पाहून वराने असाच तुफान डान्स (Wedding Dance) केला आहे. नवरदेवाचा हा डान्स व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा असते की आपले लग्न कसे खास बनवायचे. अनेक वेळा यासाठी खूप तयारी करावी लागते. आता हा व्हायरल व्हिडिओ पाहा, एक वर आपल्या लग्नाला खास बनवण्यासाठी कसा भांगडा करत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधूने प्रवेश करताच नवदेवाने जोरदार नाचायला सुरुवात केली. याला पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की तो किती आनंदी आहे आणि मोठ्या उत्साहाने वधूचे स्वागत करत आहे. इतकंच नाही तर याची स्टाईल पाहून लोकांचे डोळे पाणावले.

डान्सची इन्टाग्राम पोस्ट व्हायरल

लोकांना डान्सचा हा व्हिडिओ इतका आवडला आहे की ते सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही ‘brides_special’ नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून त्याचे कौतुक करत आहेत. व्हिडिओवर आतापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर कमेंट आणि लाईकचाही पाऊस पडत आहे.

व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले – या वराने एका अप्रतिम वधूचे स्वागत केले आहे. आणखी एका युजरने लिहिले – वराचा डान्स अप्रतिम आहे. तिसर्‍या यूजरने लिहिले – माझी इच्छा आहे की लग्नाच्या दिवशी माझ्या नवदेवानेही असाच डान्स करावा. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये हजारो इमोजीही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओची चांगलीच हवा आहे. लग्न हा क्षण एकदाच आयुष्यात येतो त्या आठवणी साठवूण ठेवल्या जातात, असे क्षण आणखी खास बनवण्यासाठी काही ना काही हटके करण्याचा प्रत्येकाचा मानस असतो.

Video: द ग्रेट खलीही झाला अल्लु अर्जुनचा फॅन, हटके अंदाजात म्हणाला…पुष्पाराज, मैं झुकेगा नहीं!

Chicken Burgerचा हा Video पाहून यूझर्स म्हणतायत, ओ मेरे बर्गर जो तुम खाओगे, बड़ा पछताओगे!

Viral : दोन इमारतींवरून कशी मारली उडी? Videoमध्ये पाहा excellent Jump