AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : दोन इमारतींवरून कशी मारली उडी? Videoमध्ये पाहा excellent Jump

इंटरनेट जगतात लोकप्रिय होण्यासाठी सोशल मीडिया (Social Media) यूझर्स काय करतील, याचा काही नेम नाही. लोक त्यांच्या व्हिडिओ आणि फोटोंना लाइक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी असे धोकादायक स्टंट (Stunt) करतात, जे पाहिल्यानंतर त्यांच्या आपल्या हृदयाचे ठोके वाढतील. सध्या एका मुलाचा असाच एक स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.

Viral : दोन इमारतींवरून कशी मारली उडी? Videoमध्ये पाहा excellent Jump
स्टंट करणारा तरूण
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jan 28, 2022 | 3:34 PM
Share

Boy Dangerous Stunt Video : इंटरनेट जगतात लोकप्रिय होण्यासाठी सोशल मीडिया (Social Media) यूझर्स काय करतील, याचा काही नेम नाही. काही लोक त्यांच्या व्हिडिओ आणि फोटोंना लाइक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी असे धोकादायक स्टंट (Stunt) करतात, जे पाहिल्यानंतर त्यांच्या आपल्या हृदयाचे ठोके वाढतील. सध्या एका मुलाचा असाच एक स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. व्हिडिओमध्ये मुलगा ज्या पद्धतीनं एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी (Jump) मारतो, ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा मुलगा दोन इमारतींमधलं लांब अंतर सहज पार करू शकतो. अतिशय आश्चर्याचा धक्का देणारा हा व्हिडिओ अवघ्या काही सेकंदांचा आहे, मात्र तो पाहण्यासाठी तुमचं मन आणि हृदय पक्क असणं आवश्यक आहे.

आश्चर्याचा धक्का देणारा व्हिडिओ

स्टंट करताना मुलगा जी उंची आणि अंतर कापतो, ते पाहून काही लोक घाबरू शकतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा उंच इमारतीच्या गच्चीवर वेगानं धावताना दिसत आहे. यानंतर हवेत उडी मारून दुसऱ्या इमारतीच्या छतावर उडी मारली. क्षणभर वाटेल की हा मुलगा सरळ खाली जाईल. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे दोन इमारतींमधील अंतर खूप जास्त असूनही हा मुलगा अगदी सहजतेनं ते पार करतो. चला तर मग बघूया या मुलाचा अप्रतिम व्हिडिओ.

इन्स्टाग्रामवर शेअर

मुलाचा हा आश्चर्यकारक स्टंट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर all_elite_parkour या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अकाऊंटचं प्रोफाईल बघितलं तर असेच अप्रतिम व्हिडिओ या पेजवर शेअर केल्याचं कळतं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही यूझर्स आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकांनी मुलाची स्तुती केलीय. या व्हिडिओला आतापर्यंत 1200हून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. मात्र, असे धोकादायक स्टंट करू नका, असं आवाहनही काही लोकांनी केलंय.

View this post on Instagram

A post shared by David (@all_elite_parkour)

यूझर्सकडून कौतुक

एका यूझरनं कमेंट करताना लिहिलंय, की ग्रेट कर दिए भाई, हे बघण्याआधी मी घाबरून गेलो होतो.’ ‘काय उडी भाऊ, जर शक्य असते तर मी तुम्हाला 5 हजार लाइक्स दिले असते.’

Dog Video : जोरदार लाटांमध्ये बुडत होता कुत्रा मग जीव धोक्यात घालत होमगार्डनं पाण्यात घेतली उडी, आणि…

Video Viral : अंडी वाचवण्यासाठी कोंबडीनं घेतला ‘कोब्रा’शी पंगा; आपल्या चोचीनं केला हल्ला, अखेर…

Kids Video : ‘हा’ चिमुरडा शिडीवरून असा काही उतरतो… यूझर्स म्हणतायत, याला ऑलिम्पिकच्या तयारीला पाठवा

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...