AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chicken Burgerचा हा Video पाहून यूझर्स म्हणतायत, ओ मेरे बर्गर जो तुम खाओगे, बड़ा पछताओगे!

खाद्य पदार्थांचे व्हिडिओ (Food Videos) हे नेहमीच आवडीनं पाहिले जातात. मग ते रेसिपी(Recipes)चे असो वा खाद्य पदार्थांचे विनोदी व्हिडिओ. एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral) झालाय. यात एका मुलाला चिकन बर्गर खायचा असतो. मग तो एका गाड्यावर जातो. तिथं त्याला चिकन बर्गर ऑर्डर करतो. पुढे काय होतं, हे पाहणं मजेशीर आहे. त्या मुलाला चिकन बर्गर खायला मिळतो की नाही, ते व्हिडिओमध्ये दिसून येईल.

Chicken Burgerचा हा Video पाहून यूझर्स म्हणतायत, ओ मेरे बर्गर जो तुम खाओगे, बड़ा  पछताओगे!
चिकन बर्गर
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jan 28, 2022 | 4:16 PM
Share

Chicken Burger Video : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. त्यातले चांगल्या कंटेंटचे व्हिडिओ व्हायरल होतात. खाद्य पदार्थांचे व्हिडिओ (Food Videos) हे नेहमीच आवडीनं पाहिले जातात. मग ते रेसिपी(Recipes)चे असो वा खाद्य पदार्थांचे विनोदी व्हिडिओ. यूझर्स अशा व्हिडिओंना कायमच पसंती देत असतात. स्ट्रीट फूडच्या व्हिडिओंमध्ये आपल्याला विनोदी कंटेंट मिळत असतो. असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral) झालाय. यात एका मुलाला चिकन बर्गर खायचा असतो. मग तो एका गाड्यावर जातो. तिथं त्याला चिकन बर्गर ऑर्डर करतो. पुढे काय होतं, हे पाहणं मजेशीर आहे. त्या मुलाला चिकन बर्गर खायला मिळतो की नाही, ते व्हिडिओमध्ये दिसून येईल आणि ते पाहताना तुम्हाला मजाही येईल.

चिकन बर्गर नाही, तर…

मुलगा दुकानदाराला बर्गर ऑर्डर करतो, त्यावेळी त्याची किंमतही विचारतो. मग दुकानदार म्हणतो, साधा बर्गर 30 तर चिकन बर्गर 100 रुपयांना मिळेल. मग मुलगा चिकन बर्गर मागतो. तेवढ्यात एक अजून छोटा मुलगा येतो. त्यालाही काहीतरी खायचं असतं. पण पहिला मुलगा त्याला हुसकावून लावतो. तिकडे त्याचा बर्गर तयार होत असतो. बर्गर तयार झाल्यानंतर दुकानदार प्लेटमध्ये सर्व्ह करून मुलाला देतो, पण हे काय तो चिकन बर्गर नसतो. मुलगा त्याला विचारतो, त्यावर दुकानदार काय म्हणतो, त्यासाठी हा व्हिडिओ पाहा…

यूट्यूब चॅनेलवर अपलोड

सलमान नोमान (Salman Noman) या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 18 जानेवारीला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 28,809,783+ व्ह्यूज मिळाले आहेत. सांगा, पहिली कोंबडी की अंडं? (Batao murgi pehle ayee ya andaa?) असं व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलंय. या व्हिडिओवरच्या कमेंट्सही वाचण्यासारख्या आहेत. (Video Courtesy – Salman Noman)

चिमुरड्यानं स्वीकारलंय पाणीपुरी खाण्याचं चॅलेंज आणि तुम्ही? ‘हा’ Video पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी

आता शाकाहारी फिश फ्रायचा Video होतोय Viral; यूझर्स म्हणतायत, या किंमतीत दोन किलो मासे येतील!

टेस्टी आणि चटकन् होणारी डिश ट्राय करायचीय? हा Video पाहा; तुम्हीही म्हणाल, Wow delicious!

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ