AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता शाकाहारी फिश फ्रायचा Video होतोय Viral; यूझर्स म्हणतायत, या किंमतीत दोन किलो मासे येतील!

शाकाहारी फिश फ्राय ऐकलं आहे का? नसेल तर इंटरनेटवर व्हायरल (Viral) होत असलेला हा व्हिडिओ पाहा. दिल्लीत राहणाऱ्या एका फूड ब्लॉगर(Food Blogger)नं ही अनोखी डिश ट्राय केली आहे.

आता शाकाहारी फिश फ्रायचा Video होतोय Viral; यूझर्स म्हणतायत, या किंमतीत दोन किलो मासे येतील!
व्हेज फिश फ्राय
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jan 27, 2022 | 4:08 PM
Share

Vegetarian fish fry : तुम्ही कधी शाकाहारी फिश फ्राय ऐकलं आहे का? नसेल तर इंटरनेटवर व्हायरल (Viral) होत असलेला हा व्हिडिओ पाहा. दिल्लीत राहणाऱ्या एका फूड ब्लॉगर(Food Blogger)नं ही अनोखी डिश ट्राय केली आहे. पण त्याला ही अतरंगी डिश आवडली का, याचं उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे शाकाहारी पदार्थ खाल्ले असतील. पण असा शाकाहारी पदार्थ जो मांसाहारी असल्याप्रमाणं दिसतो तुम्ही क्वचितच चाखला असेल. सध्या सोशल मीडिया(Social Media)वर फूड ब्लॉगर अमर सिरोहीचा हा व्हिडिओ (Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पूर्व दिल्लीतल्या खन्ना तंदूरी जंक्शन नावाच्या दुकानात ही अनोखी डिश ट्राय करताना दिसत आहे.

फूड ब्लॉगरचा व्हिडिओ व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही फूड ब्लॉगर अमर सिरोही दुकानदाराशी बोलताना पाहू शकता. व्हिडिओच्या सुरुवातीला अमर सिरोही म्हणतो, मासे आहेत पण शाकाहारी आहेत. त्यानंतर त्यानं दुकानदाराला विचारलं, की आज तू आम्हाला काय खायला देणार आहेस. यावर विक्रेता म्हणतो, की आम्ही तुम्हाला भाजीमध्ये मासे खायला देणार आहोत. यावर फूड ब्लॉगरनं प्रश्न केला, की मासे कधीपासून व्हेज व्हायला लागले. यानंतर दुकानदार ते कसं बनवतात, हे दाखवतो. आता ते किती स्वादिष्ट झाले किंवा कसे झाले हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल.

सोयाबीन आणि आलं-लसूण पेस्टचा वापर

हा शाकाहारी मासा बनवण्यासाठी विक्रेत्यानं सोयाबीन आणि आलं-लसूण पेस्टचा वापर मुख्य घटक म्हणून केला आहे. फूड ब्लॉगर अमर सिरोही याला तर त्याची चव आवडली. त्यानं ते खाण्याचा सल्लाही दिला आहे. एकंदरीत जी चव आलीय, ती खूप छान असल्याचं तो सांगतो.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर foodie_incarnate या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. फूड ब्लॉगर अमर सिरोही यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, की शुद्ध शाकाहारी फिश फ्राय.’ हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. सहा दिवसांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 4 लाख वेळा पाहिला गेला आहे. हा आकडा सातत्यानं वाढत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘अंदर फिश Soya हुआ है’

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूझर्स प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूझरनं कमेंट करताना लिहिलं, की ‘इसके अंदर फिश Soya हुआ है. जाग गई तो दिक्कत हो जाएगी.’ त्याचवेळी आणखी एका यूझरनं खिल्ली उडवली आणि लिहिलं, की भावा, काटे पाहून खा.’ आणखी एका यूझरनं म्हटलं, की 250 रुपयांमध्ये खरे मासे येतील ते ही दोन किलो.

चिमुरड्यानं स्वीकारलंय पाणीपुरी खाण्याचं चॅलेंज आणि तुम्ही? ‘हा’ Video पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी

टेस्टी आणि चटकन् होणारी डिश ट्राय करायचीय? हा Video पाहा; तुम्हीही म्हणाल, Wow delicious!

Funny Video : बर्थ डे पार्टीला गेला, पण गिफ्ट न देताच परतला चिमुकला; आईनं विचारलं तर म्हणतो…

Follow Us
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा