Funny Video : बर्थ डे पार्टीला गेला, पण गिफ्ट न देताच परतला चिमुकला; आईनं विचारलं तर म्हणतो…

Funny Video : बर्थ डे पार्टीला गेला, पण गिफ्ट न देताच परतला चिमुकला; आईनं विचारलं तर म्हणतो...
बर्थ डे पार्टी

बर्थ डे पार्टी, बच्चे कंपनी आणि त्यातली धमाल आपल्या सर्वांनाच माहीत आहे. लहान मुलांचे क्यूट (Cute) व्हिडिओ (Video)सर्वांच्याच पसंतीस उतरतात. आता बर्थडे पार्टी(Birthday Party)चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

प्रदीप गरड

|

Jan 27, 2022 | 2:26 PM

Minku going to a Birthday Party : बर्थ डे पार्टी, बच्चे कंपनी आणि त्यातली धमाल आपल्या सर्वांनाच माहीत आहे. लहान मुलं एकत्र जमली की त्यांच्यात मजा मस्ती होत असते. आज काल सर्वांकडेच मोबाइल असल्यामुळे मग अशा मजेशीर घटनांचे व्हिडिओदेखील तयार केले जातात. सोशल मीडिया साइट्सवर अपलोड केले की मग ते वेगानं व्हायरल होतात. इंटरनेटवर तसंही लहान मुलांचंच राज्य आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. लहान मुलांचे क्यूट (Cute) व्हिडिओ (Video)सर्वांच्याच पसंतीस उतरतात. आता बर्थडे पार्टी(Birthday Party)चा एक छानसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पाहू या काय आहे नेमकं…

आई सांगते…

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक चिमुरडा बर्थ डे पार्टीसाठी तयार झालाय. तो आईला विचारतो, की मी तयार झालोय. कसा वाटतोय. मग आईपण त्याला चांगला वाटतोय म्हणते, आणि एक गिफ्ट त्याच्या हातात ठेवते. मुलगा विचारतो, की तिथं गेल्यावर लगेच द्यायचंयका? मग आई त्याला म्हणते, की हे गिफ्ट केक कापल्यानंतर द्यायचं. इकडेतिकडे ठेवू नको.

बर्थ डे पार्टी

पॅक केलेलं गिफ्ट घेऊन चिमुकला बर्थ डे पार्टीला जातो. तिथं आपल्या मित्राला शुभेच्छा देतो. मग मित्र त्याला गिफ्ट मागतो. पण हा काही गिफ्ट द्यायला तयारच नसतो. थोड्यावेळानं देतो म्हणता म्हणता शेवटी परत आईकडे जातो. आई विचारते गिफ्ट का नाही दिलं. तर तो म्हणतो, त्यानं केकच कापला नाही!

यूट्यूब चॅनेलवर अपलोड

हा मजेदार व्हिडिओ राज ग्रोवर (Raj Grover) या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आलाय. Minku going to a Birthday Party असं कॅप्शन व्हिडिओला दिलंय. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून दोन दिवसांतच व्हिडिओला 5,485,543+ व्ह्यूज मिळालेत. अनेकांनी व्हिडिओला लाइक केलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही तो आवडेल. लहान मुलं किती क्यूट असतात, याचाही प्रत्यय तुम्हाला यातून येईल. व्हिडिओ पाहू या… (Video Courtesy – Raj Grover)

चिमुरड्यानं स्वीकारलंय पाणीपुरी खाण्याचं चॅलेंज आणि तुम्ही? ‘हा’ Video पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी

Video : चक्क स्पायडर मॅन खेळतोय Squid Game, तोच जीवघेणा खेळ आणि पाठलाग करणारा बंदुकधारी!

JustForLaugh : Viral Videoमध्ये काय म्हणतेय ही मुलगी, ज्यानंतर मित्र हसायला लागले!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें