Viral Video | छोट्याशा मुलीची मांजरीच्या पिलासाठी तळमळ, बोबडे बोल ऐकून नेटकरी म्हणतायत “ओ देखो म्याँऊ.. म्याँऊ कर रहे”

व्हिडीओमधील मुलीचे बोबडे बोल, चेहऱ्यावरील हावभाव आणि तिची तळमळ पाहून अनेकांनी तिची प्रशंसा केली आहे. (small cute girl viral video)

Viral Video | छोट्याशा मुलीची मांजरीच्या पिलासाठी तळमळ, बोबडे बोल ऐकून नेटकरी म्हणतायत ओ देखो म्याँऊ.. म्याँऊ कर रहे
FACEBOOK VIRAL GIRL
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 5:03 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. भोळ्याभाबड्या लहान मुलांचे तर कित्येक व्हिडीओ कायम चर्चेचा विषय ठरतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओमधील मुलीचे बोबडे बोल, चेहऱ्यावरील हावभाव आणि तिची तळमळ पाहून अनेकांनी तिची प्रशंसा केली आहे. ही मुलगी हिंदी भाषेत बोलत असून तिचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय. (small cute girl video goes viral on social media talking about cat baby)

व्हिडीओ मध्ये काय आहे ?

व्हिडीओमध्ये एक छोटीशी मुलगी हिंदी भाषेत बोलताना दिसतेय. ती अतिशय चिंताग्रस्त असल्याचं दिसतंय. तिच्या बोलण्यातून ते जाणवतंय. या मुलीच्या बोबड्या बोलण्याने सगळेच प्रभावित झालेयत. ही मुलगी जेव्हा बोलणं सुरु करते, तेव्हा तिला नेमकं काय म्हणायचं आहे, हे समजतच नाही. तिचं बोलणं अस्पष्ट वाटतंय. मात्र, थोड्या वेळाने ती कशाचीतरी तक्रार करत आहे, असे वाटते. ही मुलगी आपल्या आई-बाबांकडे कशाची शिकायत करतेय, हे शेवटपर्यंत स्पष्ट होत नाही. मात्र, व्हिडीओच्या शेवटी तिला मांजरीबद्दल तक्रार असल्याचं वाटतंय. या मुलीच्या घरात मांजरीचे एक लहान पिल्लू आहे. ते पिल्लू आपल्या आईपासून दूर असल्यामुले खूप ओरडतेय असं वाटतंय. या पिलाचा ओरडण्याचा आवाज ऐकूनच ही छोटीशी मुलगी नाराज असल्याचं दिसतंय. मांजराच्या पिलाची तिच्या आईशी झालेली ताटातूट या मुलीला सहन झालेली नाहीये. तशी नाराजी ती आपल्या आई-बाबांकडे व्यक्त करतेय.

व्हिडीओमध्ये मुलगी काय म्हणत आहे ?

व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी आपल्या आई-वडिलांशी बोलत आहे. “मांजर तिच्या पिलांना का घेऊन जात नाही. तुम्ही माझ्यावर प्रेम करता, त्यामुळे मी कुठे थांबले तर तुम्ही मला घेऊन जाल ना ! पण ती मांजर आपल्या पिलांना घेऊन जात नाहीये. ते बघा तिचे पिलं म्याँऊ.. म्याँऊ.. करत आहेत,” असे व्हिडीओतील मुलगी आपल्या आईवडीलांना म्हणतेय. मांजरीने आपल्या पिलांना घेऊन जावं, असं ती सांगतेय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पत्रकार गणेश पोकळे यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओसोबत एक मजेदार कॅप्शन दिलं आहे. “शेवटच्या वाक्याला कळतं की ही तळमळ कुणासाठी चाललीये…” असं पोकळे यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहलंय. त्यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला अनेकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी ही मुलगी खूपच गोड आहे, असे लिहले आहे. या मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

इतर बातम्या :

Viral Video : माणसांना लाजवेल असा कुत्र्याचा व्यायाम, अनेकांनी घेतली प्रेरणा, व्हिडीओ व्हायरल

Video | रागवलेल्या हत्तीने केळीची अख्खी बाग उद्ध्वस्त केली, फक्त एक झाड ठेवलं, कारण पाहाच

Viral Video : त्याने भल्या मोठ्या सापाला उचललं अन् थेट लुंगीत टाकलं; नंतर जे झालं ते एकदा बघाच

(small cute girl video goes viral on social media talking about cat baby)

Non Stop LIVE Update
'जेवढे जेवढे लोक भाजपमध्ये येतील...,' काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे
'जेवढे जेवढे लोक भाजपमध्ये येतील...,' काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे.
उडता पंजाब झाला आता उडता महाराष्ट्र होणार का? सुप्रिया सुळे यांची टीका
उडता पंजाब झाला आता उडता महाराष्ट्र होणार का? सुप्रिया सुळे यांची टीका.
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर.
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?.
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले.
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस.
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट.
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच....
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच.....
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले.
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका.