Video: द ग्रेट खलीही झाला अल्लु अर्जुनचा फॅन, हटके अंदाजात म्हणाला…पुष्पाराज, मैं झुकेगा नहीं!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: दादासाहेब कारंडे, Tv9 मराठी

Updated on: Jan 28, 2022 | 6:51 PM

द ग्रेट खलीने पुष्पा चित्रपटातील एका प्रसिद्ध डायलॉगला लिपसिंक करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहता पाहता व्हायरल झाला आहे. द ग्रेट खलीची नवीन स्टाईल यूजर्सना भुरळ घातलतेय.

Video: द ग्रेट खलीही झाला अल्लु अर्जुनचा फॅन, हटके अंदाजात म्हणाला...पुष्पाराज, मैं झुकेगा नहीं!
खलीचा हटके अंदाज

दादासाहेब कारंडे, प्रतिनिधी, मुंबई : अल्लु अर्जुन (Allu Arjun) स्टारर तेलगू चित्रपट ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa The Rise) रिलीज झाल्यापासून, त्यातील गाणी, नृत्य आणि डायलॉगनी ‘सोशल मीडिया वर्ल्ड’मध्ये वर्चस्व निर्माण केले आहे. या चित्रपटाची उत्सुकता सर्वांच्याच डोक्यात वाढत आहे. काही अल्लू अर्जुनच्या डान्स स्टेप्सवर रील बनवत आहेत, तर काही त्याच्या इंटरनेटवरील प्रसिद्धडायलॉगना लिप सिंक करत आहेत. या यादीत ग्रेट खलीचाही  (The Great Khali) समावेश झाला आहे. त्याने पुष्पा चित्रपटातील एका प्रसिद्ध डायलॉगला लिपसिंक करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहता पाहता व्हायरल झाला आहे. द ग्रेट खलीची ही स्टाईल युजर्सना खूप आवडली आहे. मजेशीर प्रतिक्रिया देत युजर्सने असेही म्हटले आहे – सर, तुमच्यापुढे कुणीही नतमस्तक होईल. खलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

खलीचा हटके अंदाज

आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, द ग्रेट खली अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातील प्रसिद्धडायलॉगला लिपसिंक करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, द ग्रेट खली एका टेबलासमोर डोके टेकवून खुर्चीवर बसलेला दिसत आहे. यानंतर अल्लू अर्जुनचा प्रसिद्ध डायलॉग ‘पुष्पा…पुष्पा राज’. मै झुकेगा नहीं.’ व्हिडिओमध्ये द ग्रेट खलीचे एक्सप्रेशन्सही अप्रतिम दिसत आहेत. अल्लू अर्जुनच्या स्टाईलशी जुळवून घेण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला आहे.

खलीची इन्स्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by The Great Khali (@thegreatkhali)

द ग्रेट खलीने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर हे शेअर केले आहे. हा व्हिडिओ लोकांना किती आवडला आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, दोन दिवसांपूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला 51 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर द ग्रेट खलीचे चाहतेही उत्स्फूर्तपणे आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत. खली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो जेव्हा एखादी पोस्ट शेअर करतो तेव्हा ती लगेच व्हायरल होते.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर द ग्रेट खलीचा एक चाहता म्हणतो, सर, तुमच्यापुढे नतमस्तक होईल कुणीही? त्याचवेळी आणखी एका चाहत्याने मजेशीर स्वरात कमेंट केली, ‘सर, फक्त जॉनी भैया तुम्हाला नतमस्तक करू शकतात.’ आणखी एका युजरने चित्रपटाच्या डायलॉगमध्ये लिहिले आहे, ‘खली साहब पुष्पराज.’ एकूणच ही स्टाईल ग्रेट आहे. खलीला सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहे. लोक त्याच्या या लिपसिंकचा खूप आनंद घेत आहेत.

Video : …हा तर दुकानदाराचाही बाप निघाला! काय घडलं पाहा; मग म्हणाल, शेवटी ग्राहकच असतो राजा..!

Viral Video : मुलगा मगरीला खाऊ घालत होता खाद्य आणि अचानक…

129 मुलांचा बाप असलेला हा ‘विकी डोनर’ तगडा आहे! या वर्षी त्यात आणखी 9 मुलांची भर पडणार

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI