Video : ढील दे दे रे बंदर भैया… पतंगबाजीत माकडही नव्हतं मागे, संक्रांतीदिवशी छतावर चढत दिला शानदार परफॉर्मन्स

| Updated on: Jan 17, 2022 | 12:49 PM

पतंग उडवतानाचा एक एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होत आहेत. याच प्रकारातला एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सर्वांना हसवल्याशिवाय राहत नाहीय.

Video : ढील दे दे रे बंदर भैया... पतंगबाजीत माकडही नव्हतं मागे, संक्रांतीदिवशी छतावर चढत दिला शानदार परफॉर्मन्स
पतंग उडवताना माकड
Follow us on

14 जानेवारी रोजी देशभरात मकर संक्रांती(Sankranti)चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी पतंगबाजी(Kite)साठी लोकांमध्ये सर्वाधिक उत्साह असतो. सेलिब्रेशननंतर पतंग उडवतानाचा एक एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होत आहेत. याच प्रकारातला एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सर्वांना हसवल्याशिवाय राहत नाहीय. मकरसंक्रांतीच्या निमित्तानं एका माकडा(Monkey)नंही पतंगबाजीत भाग घेत शानदार परफॉर्मन्स दिला, त्याचाच हा व्हिडिओ आहे.

पंतग उडवला आणि फाडलाही…

समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक माकड छताच्या टाकीवर बसलं आहे आणि मांजा धरून पतंग उडवतंय. खरंतर कापलेल्या पतंगाचा मांजा त्याच्या अंगावर आला. मग काय, माकडानं पतंग पकडला आणि इतरांची नक्कल करावीशी वाटली. गंमत म्हणजे या माकडानंही हा पतंग अतिशय चांगल्या पद्धतीनं उडवला. तो मांजा ओढू लागला. आकाशात अनेक पतंग उडत होते, तोही उडवू लागला. मग त्यानं पतंग आपल्या दिशेनं ओढला आणि फाडला.

ट्विटरवर शेअर

हा व्हिडिओ ट्विटरवरून समोर आला आहे. आता हाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत शेकडो लोकांनी पाहिला आहे. अनेक लाइक्स आणि रिट्विट्सही आले आहेत. कमेंट बॉक्समध्ये पाहिल्यास हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. माकडाचा असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही, पण अनेकदा माकडांचे सर्व मजेशीर व्हिडिओ असे व्हायरल होत असतात. जयपूरचा हा व्हिडिओही व्हायरल होत असून अनेकजण यावर कमेंट्सही करत आहेत.

UP Assembly Election 2022 : ‘मनिके मागे हिते’च बीजेपी व्हर्जन ऐकलं का? सोशल मीडियावर Video होतोय Viral

चिते की चाल, बाज की नजर और ‘हरिणाच्या उडीवर’ संदेह नहीं करते! Video पाहून बाजीरावपण हेच म्हणाले असते

Viral Video : बाळाला रांगायला शिकवतंय ‘हे’ कुत्र्याचं पिल्लू; पाहा, कुत्रा आणि बाळाचा खट्याळपणा