UP Assembly Election 2022 : ‘मनिके मागे हिते’च बीजेपी व्हर्जन ऐकलं का? सोशल मीडियावर Video होतोय Viral

UP Assembly Election 2022 : 'मनिके मागे हिते'च बीजेपी व्हर्जन ऐकलं का? सोशल मीडियावर Video होतोय Viral
मनिके मागे हिते (हिंदी), भाजपाचं यूपी इलेक्शनमधलं प्रचारगीत

उत्तर प्रदेश (Utter Pradesh) निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या दृष्टीनं सर्वात मोठ्या राज्यात प्रचारही धडाक्यात सुरू आहे. यामध्ये एक गाणं सध्या सर्वत्र ऐकायला मिळतंय, ते म्हणजे मनिके मागे हिते(Manike Mage Hithe).

प्रदीप गरड

|

Jan 17, 2022 | 9:32 AM

मुंबई : उत्तर प्रदेश (Utter Pradesh) निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. उत्तर प्रदेश विधानसभा (Assembly)निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीपासून मतदान सुरू होणार असून ते सात टप्प्यात पार पडेल. तसेच विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी घोषित केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या दृष्टीनं सर्वात मोठ्या राज्यात प्रचारही धडाक्यात सुरू आहे. यामध्ये एक गाणं सध्या सर्वत्र ऐकायला मिळतंय, ते म्हणजे मनिके मागे हिते(Manike Mage Hithe). काय आहे खास, जाणून घेऊ या…

प्रचारगीताच्या उद्देशानं…

तुम्ही म्हणाल, हे गाणं तर एका श्रीलंकन गायिकेनं त्यांच्या भाषेत गायलंय. त्या गाण्याचे विविध व्हर्जन्सही आपण ऐकले असतीलच. आता यूपी एलेक्शनच्या पार्श्वभूमीवर हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मात्र गायिकाही वेगळी आहे आणि गाण्याचे शब्दही निराळे. हे गाणं वापरलंय प्रचारगीताच्या उद्देशानं…

सोशल मीडियावर ट्रेंड

हिंदी भाषेत या गाण्याच्या चालीत एक प्रचारगीत तयार करण्यात आलंय. जवळपास 1 मिनिट 46 सेकंदाचं हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालंय. यूपी में पुरे किये, जनतासे किए हुए, वादे… असे या गाण्याचे बोल आहेत. सध्या हे गाणं ट्रेंडिंग असून यूझर्सही यावर कमेंट्स करतायत.

‘…ही तर श्रीलंकेसाठी अभिमानाची बाब’

एकानं लिहिलंय, की श्रीलंकन गायिका योहानीचं ‘मनिके मागे हिते’ आता भारताच्या निवडणूक कॅम्पेनचा एक भाग झालंय. एका यूझरनं म्हटलंय, फायनली समजला मनिके मागे हिते या गाण्याचा अर्थ. तर आणखी एकानं म्हटलंय, की योहानीचं हे सुप्रसिद्ध गाणं नरेंद्र मोदी, भाजपानं निवडणुकीसाठी वापरणं म्हणजे श्रीलंकेसाठी अभिमानाची बाब आहे. काहीजण म्हणतायत, योहानीचं हे बीजेपी व्हर्जन आहे.

UP ELECTION 2022 : उत्तर प्रदेशाच्या रणसंग्रामासाठी भाजप तयार, 44 ओबीसी, 19 एससी उमेदवारांना तिकीट; सोशल इंजीनियरिंगवर भर

UP Assembly Election 2022: योगी आदित्यनाथ अयोध्येतून लढणार नाही, सेफ मतदारसंघातून लढणार; उपमुख्यमंत्री मोर्य सिराथूमधून मैदानात

UP Election 2022: भीम आर्मी-समाजवादी पार्टीचं उत्तर प्रदेशात फिस्कटलं, चंद्रशेखर आजाद यांचा अखिलेश यादवांवर हल्लाबोल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें