रिव्हर्स ऑटो रेस स्पर्धा! भाऊंनी अशी रिक्षा पळवली, लोक म्हणे “ई का बवाल है भैया”

या स्पर्धेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ही विचित्र शर्यत पाहण्यासाठी व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने लोक उभे असल्याचे दिसत आहे.

रिव्हर्स ऑटो रेस स्पर्धा! भाऊंनी अशी रिक्षा पळवली, लोक म्हणे ई का बवाल है भैया
Auto Rikshaw
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 25, 2023 | 5:58 PM

महाराष्ट्रातील सांगलीमध्ये एक शर्यत आयोजित करण्यात आली होती, जी बघून तुम्ही थक्क व्हाल. हरिपूर गावात संगमेश्वर यात्रेनिमित्त रिव्हर्स ऑटो रेस स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ही विचित्र शर्यत पाहण्यासाठी व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने लोक उभे असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रिक्षाचालक रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दीच्या उपस्थितीत भरधाव वेगाने आपली रिक्षा विरुद्ध दिशेने चालवताना दिसत आहेत.

या दरम्यान काही रिक्षा उलट्या पण होतायत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शर्यतीदरम्यान एका ड्रायव्हरचा ऑटोवरील ताबा सुटतो आणि ऑटो पलटी होते. या व्हिडिओमध्ये शर्यतीदरम्यान होणारे लाइव्ह कॉमेंट्री ऐकू येत आहे. चला तर मग बघुयात यावर लोकांची काय प्रतिक्रिया होती.

आता सोशल मीडियावर युजर्स या व्हिडिओबद्दल बोलत आहेत. कुणी तरी आश्चर्याने विचारलं आहे- रिक्षांनाही रिव्हर्स गिअर असतं का, तर अनेक जण म्हणत आहेत की, अशा धोकादायक शर्यतींचं आयोजन थांबवायला हवं.