
चोरी करण्याच्या अगोदर कोणताही चोर अगोदर संपूर्ण परिसर बघतो. त्यानंतर योग्य वेळ साधत चोरी करतो. चोर कायमच याची काळजी घेतो की, काहीही झाले तरीही चोरी करताना त्या वस्तूचा मालक त्याठिकाणी पोहोचू नये. जर असे झालेच तर चोर झटापट करून वस्तू चोरण्याचा देखील प्रयत्न करतो. आता असाच एक हैराण करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये एक नाही तर तब्बल तीन चोर दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करतात आणि घाबरून पळून जातात.
व्हिडीओमध्ये आपण बघू शकता की, सर्वात अगोदर एक व्यक्ती दुचाकी दुरूस्ती करण्याचा प्रयत्न करत असल्याचा नाटक करत होता. मग दुसरा व्यक्ती थेट येतो आणि गाडीवर बसतो. दोघेही एकमेकांना बघून हैराण झाले, दोघांनाही काहीच कळत नाहीत. हे दोघे एकमेकांकडून बघत असतानाच तिथे तिसरा व्यक्ती येतो. दोघांनाही वाटते की, हाच या दुचाकीचा मालक आहे.
यानंतर दोघेही या तिसऱ्या चोराला दुचाकीचा मालक समजून पळ काढतात. त्या तिसऱ्या चोराला देखील काही कळत नाही. त्याला वाटते की, आपल्याला दुचाकी चोरण्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर तो दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करत असतानाच तिथे एक सरदारजी पोहोचले आणि विशेष म्हणजे या सरदारजींच्या हातात गाडीची चावी दिसत आहे. दुचाकीसमोर ते हातातली चावी फिरवताना दिसतात.
जेव्हा हा तिसरा चोर हे बघतो, त्यावेळी त्याला वाटते की, हा या दुचाकीचा मालक आहे. त्यानंतर तो चोर थेट घाबरून पळून जातो. मात्र, नेमकं काय घडतं आहे हे त्या सरदारजींना कळत नाही. त्यांनी देखील याकडे दुर्लक्ष करत त्या दुचाकीच्या जवळ त्यांची चारचाकी पार्क केलेली गाडी घेऊन निघून जातात. पहिले दोन चोर हे तिसऱ्या चोराला गाडीचा मालक समजतात आणि तिसरा चोर सरदारजीला गाडीचा मालक समजून भीतीने पळून जातो. मात्र, ते सरदारजी त्या दुचाकीचे मालक नव्हतेच. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. शेवटी तीन चोरांनी प्रयत्न करूनही चोरी होत नाही.