Video: कधी डायलाॅग तर कधी, गाणे ऐकवत पाजतो चहा, व्हिडीओ पाहून तुम्हीसुध्दा व्हाल फॅन

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @abhinavjeswani नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, जो फूड ब्लॉगर आहे.

Video: कधी डायलाॅग तर कधी, गाणे ऐकवत पाजतो चहा, व्हिडीओ पाहून तुम्हीसुध्दा व्हाल फॅन
चहावाला
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 12, 2023 | 6:52 PM

मुंबई, भारतात चहाप्रेमींची कमी नाही. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकारणाच्या गप्पा या चहाच्या कट्यावरच अधिक रंगतात. हिवाळ्याच्या दिवसात तर चहा अनेकांसाठी जिव की प्राण असतो. अनेकदा रस्त्याच्या कडेला मिळणार्‍या चहाच्या घोटाचा आस्वाद घेताना लोकं दिसतात, पण चहासोबत एखादं गाणं ऐकायला मिळालं तर हा वेळ आणखीनच खास होतो. अलीकडेच, अशाच एका चहावाल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. जो गरम चहासोबत रोमँटिक गाणी गाऊन लोकांची मने जिंकतो. इतकेच नाही तर हा चाहावाला (Chaiwala Video) एकापेक्षा एक चित्रपट संवाद आणि अनेक कलाकारांच्या मिमिक्रीद्वारे ग्राहकांचे मनोरंजन करतो.

 

मिमीक्री करत बनवतो चहा

एमबीए ते दिलजले पर्यंत चायवालाबद्दल तुम्ही आजपर्यंत ऐकले असेलच, पण आज आम्ही तुम्हाला ज्या चहावाल्याचा व्हिडीओ दाखविणार आहोत तो अत्यंत खास आहे. या चहा वाल्याकडे अनेकजन दुरवरून चहा पिण्यासाठी येतात. या चहावाल्याच्या आवाजात जादू आहे. तो फिल्मी अंदाजात गाणे तर म्हणतोच याशिवाय वेगवेगळ्या कलाकारांचे आवाजही काढतो, त्यांची नक्कल करत चहा बनवतो.

व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती चहा बनवताना दिसत आहे, जो आपल्या अद्भुत प्रतिभेद्वारे आपल्या ग्राहकांचे मनोरंजन करत आहे. व्हिडिओमध्ये हा चाहावाला सुपरस्टार अमिताभ बच्चनपासून अमरीश पुरीपर्यंत मोठमोठ्या कलाकारांचे आवाज काढतांना दिसत आहे. यासोबतच चाहावाला सलमान खानची हृतिक रोशनची नक्कल करताना दिसत आहे. इतकंच नाही तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला चहा विक्रेत्याच्या तोंडून एक अप्रतिम गाणं ऐकायला मिळेल.

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @abhinavjeswani नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, जो फूड ब्लॉगर आहे. व्हिडिओ शेअर करताना, ‘भारतातील सर्वात प्रतिभावान चहा विक्रेता’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास 13 हजार व्ह्यूज मिळाले आहेत, तर नऊशेहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहणारे यूजर्स या प्रतिभावान चहा विक्रेत्याचे कौतुक करत आहेत.