AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेल्समनची नोकरी सोडून सुरू केली चहाची टपरी, B.Com चहावाल्याची यशस्वी गाथा

लखनौमध्ये एका B.Com झालेल्या युवकाने नोकरी सोडून चहाची टपरी सुरु केली. त्याची हि चहाची टपरी चर्चेत का आहे? जाणून घ्या

सेल्समनची नोकरी सोडून सुरू केली चहाची टपरी, B.Com चहावाल्याची यशस्वी गाथा
बी.कॉम चहावाला Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 15, 2022 | 10:42 PM
Share

लखनौ, सध्या राजधानी लखनऊमध्ये बी.कॉम चायवाला (B.Com Chaiwala) तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध होत आहे. धीरज यादव असे या तरुणाचे नाव आहे. 22 वर्षीय धीरज यादव बाबू, बनारसी दास आणि पॉलिटेक्निक क्रॉसरोड दरम्यान रस्त्याच्या कडेला एक छोटी गाडी उभी करतो. B.Com “चाय कि चुस्किया”  त्याचे नाव लोकांना आकर्षित करत आहे. धीरजने सांगितले की, तो कुशीनगरचा रहिवासी आहे, लखनऊमधून बी.कॉमचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने एका छोट्या कंपनीत सेल्समन म्हणून काम करायला सुरुवात केली. तेथे तो दरमहा आठ हजार रुपये पगारावर काम करत होता. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा खूप दबाव होता,  इतकंच नाही तर घरी जावं लागलं तेव्हा सुटीही मिळाली नाही.

लोकं काय म्हणतील?

या सर्व प्रकाराला कंटाळून तो सेल्समनची नोकरी सोडून कुशीनगर येथील आपल्या घरी परतला. तेथे त्याने आपल्या कुटुंबीयांना चहाचे दुकान काढायचे असल्याचे सांगितले. मुलगा B.Com करून चहा विकतोय असे परिचयाच्या लोकांना माहिती झाले तर लोकं हसतील म्हणून घरच्यांनी कुशीनगर येथे टपरी लावण्यास मनाई केली. त्यामुळे त्याने लखनौमध्ये चहाची टपरी टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो लखनौला गेला. जी काही बचत होती त्यातून त्याने गाडीसह इतर वस्तू खरेदी केल्या आणि गेल्या 4 महिन्यांपासून तो बी.कॉम चायवाला  या नावाने चहाची टपरी चालवत आहेत.बाबू बनारसी दास किंवा आसपासच्या इतर संस्थांमधून सर्व विद्यार्थी त्याच्याकडे चहा प्यायला येतात.

कमाई किती आहे?

चहा विकून धीरज दिवसाला साधारणपणे अडीच हजार रुपये कामवितो. म्हणजे एका महिन्यात 60 हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न तो कामवितो, जे सेल्समनच्या नोकरीच्या पगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. धीराजने सांगितले की, भविष्यात त्याला हा उद्योग स्टार्टअपच्या माध्यमातून पुढे न्यायचा आहे. सकाळी 5.00 ते रात्री 10:00 वाजेपर्यंत तो याठिकाणी आपले दुकान थाटतो.

तीन प्रकारचा चहा विकतो

धीरज तीन प्रकारचा चहा बनवितो. पहिला चहा पान मसाला चाय आहे ज्याची किंमत 20 रुपये आहे. दुसऱ्या वेलची चहाची किंमत 15 रुपये आहे आणि  मसाला चहा 25 रुपये आहे.

Follow Us
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात