Video: उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने रस्त्याच्या मधोमध स्कुटीवर केली आंघोळ, व्हिडिओ व्हायरल

VIRAL VIDEO | व्हायरल व्हिडीओमध्ये एक कपल दिसत आहे. हे कपल एका स्कुटीवरुन उन्हात जात आहे. अचानक गाडी थांबल्यानंतर दोघे रस्त्यात एका टपातून पाणी काढून अंधोळ करीत आहे.

Video: उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने रस्त्याच्या मधोमध स्कुटीवर केली आंघोळ, व्हिडिओ व्हायरल
चालत्या गाडीवर अंघोळ करणाऱ्यांवर कारवाई
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 18, 2023 | 2:16 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social Media Viral Video) एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक कपल (Couple) रस्त्यामध्ये अंधोळ करीत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ तयार केले जातात. व्हायरल होण्यासाठी तरुणी आणि तरुणी रोज नव्या कल्पना घेऊन व्हिडीओ तयार करतात. ज्याचा व्हिडीओ चांगला झाला आहे. त्याचेचं व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. सध्या जो सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. तो महाराष्ट्रातील उल्हासनगर (Maharashtra Ulhasnagar) शहरातील असल्याचं एका वेबसाईटनं सांगितलं आहे. व्हिडीओला पाहून अधिक कमेंट येत आहेत.

व्हिडीओत या गोष्टी खास आहेत

व्हायरल व्हिडीओत काही खास गोष्टी पाहायला मिळत आहेत. एक कपल स्कुटीवर जात आहे. स्कुटी सिंग्नलवरती थांबल्यानंतर त्यांच्याकडे बारडीत असलेल्या पाण्याने दोघं अंधोळ करीत आहेत. मुलगा स्कुटी चालवत आहे, तर त्या मुलीच्या हातात बारडी आहे. मुलगी दोघांच्या अंगावर पाणी ओततं आहे. हे सगळं पाहत असताना तिथल्या लोकांना धक्का बसला. व्हिडीओच्या कमेंटमध्ये अनेक लोकांनी आपला राग व्यक्त केला आहे.

देशात तापमान चांगलचं वाढलंय

संपूर्ण देशात चांगलीचं गर्मी पडली आहे. लोकं गर्मीच्या बचावासाठी विविध पद्धतीचे उपाय शोधत आहेत. परंतु सध्या व्हायरल झालेल्या कपलचा उपाय सगळ्यात वेगळा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला आहे की, अनेकांच्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंद केल्या आहेत.हा व्हिडीओ @ItsAamAadmi नावाच्या अकाऊंटवरुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करीत असताना हा व्हिडीओ उल्हासनगरमधील असल्याचं म्हटलं आहे. मी अशा लोकांवरती चांगली कारवाई करावी अशी मागणी करतो.