Vidhansabha Trending: देवेंद्रजी पुरून उरले, जयंत पाटील घाईगडबडीत टोला मारून गेले, विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर आले!

| Updated on: Jul 03, 2022 | 2:11 PM

Vidhansabha Trending: जयंत पाटलांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि घाईगडबडीत राज्यपालांना टोला मारून घेतला या सगळ्यात काय झाडी काय डोंगर याचं एक वेगळं अस्तित्व होतं. बघुयात आजचं स्पेशल विधानसभा ट्रेंडिंग !

Vidhansabha Trending: देवेंद्रजी पुरून उरले, जयंत पाटील घाईगडबडीत टोला मारून गेले, विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर आले!
देवेंद्रजी पुरून उरले, जयंत पाटील घाईगडबडीत टोला मारून गेले
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: चला आज एकदम हॉट टॉपिकवरचे ट्रेंडिंग व्हिडीओज बघुयात. निवडणूक पार पडताना आणि निवडणूक पार पडल्यावर सभागृहात अनेक किस्से घडले, कुणी मतमोजणी करताना अडखळलं, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) नेहमीप्रमाणेच कडक बोलले, उपमुख्यमंत्री अजित पवार पुरून उरले. जयंत पाटलांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि घाईगडबडीत राज्यपालांना टोला मारून घेतला या सगळ्यात काय झाडी काय डोंगर याचं एक वेगळं अस्तित्व होतं. बघुयात आजचं स्पेशल विधानसभा ट्रेंडिंग (Vidhansabha Trending) ! अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (MLA Jayant Patil) यांनी पोल मागितला. त्यानंतर नरहरी झिरवळ यांनी मतदान प्रक्रिया सुरू करण्यास प्रशासनाला आदेश दिले. त्यानंतर प्रत्येक सदस्यांजवळ जाऊन त्यांचे नाव नोंदवून घेतले गेले आणि मतदान प्रक्रिया पार पडली. राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली. तर साळवी यांना 107 एवढ्याच मतांवर समाधान व्यक्त करावं लागलं.

1) संधी साधली! जयंत पाटलांनी टोला लगावला…

आजपासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झालंय. अध्यक्ष निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी राज्यपालांना चांगलाच टोला लगावला आहे. बघा काय म्हणाले,

हे सुद्धा वाचा

2) देवेंद्र फडणवीसांची तुफान बॅटिंग

देवेंद्र फडणवीसांनी जावई आणि सासऱ्याचं नातं सांगितलं! जावई सासऱ्याच्या जागी कसा आणि कुठल्या स्थानी असतो ते सांगितलं आणि जोरदार बॅटिंग केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधासभेत बोलताना पुरून उरलेले आहेत…बघा हा व्हिडीओ

3) छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय श्रीराम !!

राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेल्या नवनिर्वाचित अध्यक्षांना राहुल नार्वेकरांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर पक्षाचे प्रमुख नेते आसनाकडे घेऊन जायला पुढे सरसावले. सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि वंदे मातरम, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय! अशा घोषणांनी सभागृह गजबजून गेले.

(आमचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही. बातमी मनोरंजाच्या हेतूने करण्यात आलेली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)