99 टक्के लोकांनी हा जीव ओळखलाच नाही, सर्वच म्हणाले, साप.. पण नाही, तुम्ही तरी ओळखू शकता काय?

इंटरनेटवर एका जीवाचा फोटो व्हायरल होत आहे, ज्याला लोक साप समजत आहेत. पण तो साप नसून 'एटलस मोथ' नावाचे दुर्मिळ फुलपाखरू आहे. त्याच्या पंखांवरील नक्षी सापाच्या डोक्यासारखी दिसते, हा निसर्गाचा चमत्कारिक संरक्षण कवच आहे. हे फुलपाखरू शिकार टाळण्यासाठी असा भ्रम निर्माण करते.

99 टक्के लोकांनी हा जीव ओळखलाच नाही, सर्वच म्हणाले, साप.. पण नाही, तुम्ही तरी ओळखू शकता काय?
Guess the Thing
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 24, 2026 | 6:42 PM

इंटरनेटवर एका जीवाचा फोटो व्हायरल होत आहे. हा व्हायरल फोटो पाहून सर्वांना धक्का बसला आहे. लाकडाच्या आड हा जीव बसला आहे. हा जीव दोन डोके असलेल्या सापासारखाच दिसतो. लोकांनी हा फोटो पाहिला आणि काळजात धडकीच भरली. सर्वांना तो विषारी साप असावा असं वाटलं. पण तो विषारी साप नाहीये. काहींना तर हा जीव ओळखूच आलेला नाही. पण जेव्हा हा जीव कोण आहे हे कळलं तेव्हा तर त्यांची अगदी तंतरलीच. काहींना आश्चर्याचा धक्का बसला. ज्याला साप समजत होते तो तर…

हा फोटो तुम्ही अत्यंत निरखून पाहा. तुम्हाला वाटेल लाकडाला वेटोळे घालून एखादा साप बसला आहे. काही लोक तर हा फोटो पाहून घाबरले सुद्धा. पण खरंतर हा काही सरपटणारा प्राणी नाहीये. तर निसर्गाचा हा चमत्कार आहे. निसर्गाने बनवलेली एक कलाकृती आहे. त्याला पाहिल्यावर भ्रम होतो आणि पहिल्यांदा पाहताच हा साप दिसतो.

Guess

सत्य समोर आलं अन्…

एकदम जवळ जाऊन पाहिल्यानंतर हा साप नसून एटलस मोथ म्हणजे एक प्रकारचं फुलपाखरू असल्याचं स्पष्ट झालं. या फुलपाखराच्या पंखावर असलेल्या धारा आणि पॅटर्न हा नागाच्या डोक्या सारखाच आहे. निसर्गानेच या फुलपाखराला हे अद्भूत रुप दिलं आहे. आपल्या नाजूक शरीराला शिकारींपासून वाचण्यासाठी निसर्गाने हे शरीर दिलंय. हे फुलपाखराचं सुरक्षा कवच आहे. साप समजून लोक तिच्याकडे जात नाहीत. त्यामुळे फुलपाखराचा जीव सुरक्षित राहतो. ही एक दुर्मीळ प्रजाती आहे.

फोटो व्हायरल होतोय…

हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोग हा फोटो ताबडतोब शेअर करत आहेत. हे फुलपाखरू आहे यावर लोकांचा विश्वासच बसत नाहीये. हे एक ऑप्टिकल इल्यूजनचं चांगलं उदाहरण आहे. त्यामुळे जर तुम्हाला आता काही असं भीतीदायक दिसलं तर घाबरू नका. अंदाज घ्या आणि खातरजमा करा. सर्वच दृश्य नजरेला दिसतात तसे नसतात. काही वेळा निसर्गाची किमयाही असू शकते.

Follow Us