Viral: नेटकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील आणि राणेंना सुद्धा नाचवलं! एक नजर टाकुयात “मिम्स” वर…

कुणी समर्थन, कुणी विरोध, कुणी खिल्ली उडवताना दिसतंय. बघुयात काय चाललंय नेटकऱ्यांचं या भूकंपानंतर...

Viral: नेटकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील आणि राणेंना सुद्धा नाचवलं! एक नजर टाकुयात मिम्स वर...
एक नजर टाकुयात "मिम्स" वर...
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 22, 2022 | 4:26 PM

मी आणि माझ्यासोबतच्या आमदारांनी (MLA) अद्याप दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही. आम्ही बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे कार्यकर्ते आहोत. धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आणि बाळासाहेबांचे हिंदुत्त्वाचे (Hinduttva) विचार आम्हाला पुढे घेऊन जायचे आहेत. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाशी कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही असं महत्त्वपूर्ण वक्तव्य शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी केलं. त्याचबरोबर परतीचे दोर कापले असल्याचेही स्पष्ट संकेत एकनाथ शिंदेनी दिले. या सगळ्या राजकीय घडामोडीत चर्चांना उधाण आलं राजकीय भूकंपाचे हादरे राजकीय पक्षांपासून सामान्यांपर्यंत सगळ्यांना बसले. इतकी मोठी राजकीय घडामोड आणि नेटकरी शांत बसतील असं होईल का ? सोशल मीडियावर अक्षरशः मिम्स (Memes) चा पाऊस पडतोय. कुणी समर्थन, कुणी विरोध, कुणी खिल्ली उडवताना दिसतंय. बघुयात काय चाललंय नेटकऱ्यांचं या भूकंपानंतर…

1) एकनाथ शिंदे आमदारांसह रवाना झाल्यानंतर शिवसेनेचा चेहरा!

एकनाथ शिंदे आमदारांसोबत सुरतला रवाना झाल्यावर शिवसेनेचा चेहरा कसा झाला असेल हे दर्शविणारं मिम! या मिम मध्ये एकनाथ शिंदे विथ 29 अदर्स असं लिहिलंय. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत 29 आमदार सुरतला घेऊन रवाना झालेत असा त्याचा अर्थ होतो.

2) “हिंदुत्त्व, हिंदुत्त्व, हिंदुत्त्व!”

केजीएफ मधला फेमस डायलॉग वायलन्स, वायलन्स, वायलन्स हा डायलॉग एकनाथ शिंदेंना लागू केलाय. नेटकऱ्यांनी एकदम मजेशीर पद्धतीनं एकनाथ शिंदेचा फोटो लावून, “हिंदुत्त्व, हिंदुत्त्व, हिंदुत्त्व!” असं लिहिलंय.

3) राजनीती सिनेमातील दृश्याचा वापर

राजनीती सिनेमातल्या नाना पाटेकरांचा डायलॉग ही घटना दर्शविण्यासाठी वापरण्यात आलाय. घटना कुठलीही असो सगळ्यात जास्त वापर नाना पाटेकरांच्या अभिनयाचाच केला जातो.

4) देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि नारायण राणे आनंदात नाचतानाचा एक क्षण

5) जेव्हा संजय राऊत एकनाथ शिंदेंना फोन करतात तेव्हा…

6) उद्धव ठाकरे आणि संजय राऊत एकनाथ शिंदेंना काय म्हणाले असतील ते ही नेटकऱ्यांनी शोधून काढलंय

 

(आमचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही. बातमी मनोरंजाच्या हेतूने करण्यात आलेली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)