AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साहेब तोंड दाखवायला जागा राहिली नाही, लोक शिव्या घालताये हो…, भाजपच्या बड्या नेत्याला कार्यकर्त्याचा फोन, ऑडिओ क्लीप व्हायरल

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोक चव्हाण आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुका दुष्काळाच्या यादीमधून वगळण्यात आल्याने या कार्यकर्त्याने नाराजी व्यक्त केली आहे.

साहेब तोंड दाखवायला जागा राहिली नाही, लोक शिव्या घालताये हो..., भाजपच्या बड्या नेत्याला कार्यकर्त्याचा फोन, ऑडिओ क्लीप व्हायरल
अशोक चव्हाण यांना कार्यकर्त्याचा फोन Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 27, 2026 | 9:27 PM
Share

पावसाभावी शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पिकं वाळून गेली आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा घोषणा केली आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जवळपास 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला आहे. राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. परंतु काही तालुके यामधून वगळण्यात आले आहेत. जे तालुके दुष्काळातून वगळण्यात आले आहेत, तिथे आता नाराजी पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोक चव्हाण आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुका दुष्काळाच्या यादीमधून वगळण्यात आल्याने या कार्यकर्त्याने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या ऑडिओ क्लीपची टीव्ही 9 मराठी कोणतीही पुष्ठी करत नाही.

मुदखेड तालुका दुष्काळाच्या यादीतून का वगळला? लोकं आता आम्हाला शिव्या घालत आहेत, तालुका कशामुळे वगळला? याचं कारण तर लोकाला आता आम्हाला द्यावं लागेलना, असा जाब विचारणारा फोनच थेट एका कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांना केला आहे. या फोनची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे.  यावर बोलताना  24 तास ही झाले नाहीत, तर उगाच बोंबाबोंब करत राहता, शासनाने काही केलच नाही का? शांत राहा दोन दिवस, शिव्या खा असा सल्ला यावर अशोक चव्हाण यांनी संबंधित कथित ऑडिओ क्लिपमधून आपल्या कार्यकर्त्याला दिल्याचं दिसून येत आहे. ही कथित ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. परंतु हा कार्यकर्ता नेमका कोण आहे? हे मात्र अद्याप समजू शकलं नाहीये, सदर ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर जोरदार व्हायरल होत आहे.

ऑडिओ क्लिप जशीच्या तशी

कार्यकर्ता-  साहेब रामराम वो,

बोलाना, काळजी करू नका मुदखेड तालुका दुष्काळात शंभर टक्के राहिलं

कार्यकर्ता – काय काळजी करू नका सर , आम्ही जुने कार्यकर्ते. आता आम्हाला तोंड काढायला जागा नाही कुठं , लोक शिव्या देतात आम्हाला, साहेब आपला तालुका कशामुळे वगळला?

अरे थांबा ना थोडं, येवढी घाई कसली लागली, विश्वास तर ठेवा ना थोडा.

कार्यकर्ता – तसं नसतं  साहेब,कारण तर सांगावं लागलं ना लोकांना. आहो अख्ख्या महाराष्ट्रातले एवढे तालुके घेतले, आपल्याच जिल्ह्यातले दोन तालुके कशामुळे वगळले?

अरे विश्वास तर ठेवा, तुम्हाला काय म्हणायची गरज नाही  24 तास ही झाले नाहीत, उगाच बोंबाबोंब करीत राहतात, शासनाने काही केलच नाही का?

कार्यकर्ता – अहो साहेब तुम्हाला कळते तेवढं आम्हाला कळत नाही, पण तालुका वगळण्याचं नेमकं कारण काय?

थांबा जरास, शांत राहा, दोन दिवस शिव्या खा, हरकत नाही

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!