Viral Video: ह्या…हुई हू.. हिय्या! जे तर काय वाढीव धुतलंय पोरीने या पोरांना…एकच नंबर!

| Updated on: Jun 16, 2022 | 12:24 PM

अनेकदा महिलांना सराव करून स्वरक्षणाचे वर्ग घेण्यास सांगितले जाते. मात्र, हल्ली मुली खूप स्मार्ट झाल्या आहेत आणि अडचणीतून बाहेर कसं पडायचं हे त्यांना आपापल्या परीने कळतं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे

Viral Video: ह्या...हुई हू.. हिय्या! जे तर काय वाढीव धुतलंय पोरीने या पोरांना...एकच नंबर!
ह्या...हुई हू.. हिय्या!
Image Credit source: Twitter
Follow us on

दररोज लाखो महिलांचा लैंगिक छळ होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. गुन्हेगारांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी अनेकदा महिलांना सराव करून स्वरक्षणाचे धडे (Self Defence) घेण्यास सांगितले जाते. मात्र, हल्ली मुली खूप स्मार्ट (Smart Girl) झाल्या आहेत आणि अडचणीतून बाहेर कसं पडायचं हे त्यांना आपापल्या परीने कळतं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Video Is Viral On Social Media) होत आहे, ज्यामध्ये काही मुलं एका मुलीला चारही बाजूंनी घेरून तिला त्रास द्यायला सुरुवात करतायत, मात्र या मुलीने यावेळी सर्वांना सडेतोड उत्तर दिलं.

सुनसान रस्त्यावर मुलांनी घेरले…

इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक धाकड मुलगी दिसून येते, ती मुलगी त्या धमकावणाऱ्या 6 मुलांना मारहाण करताना दिसून येते. या व्हिडीओमध्ये 6 जण एका निर्जन रस्त्यावर एका मुलीला घेरून त्रास देताना दिसत आहेत. या व्हिडिओचे लोकेशन अद्याप समजू शकलेले नाही. त्यानंतर ती मुलगी त्या मुलांशी भांडते आणि त्यांना फ्लाइंग किकसह काही मार्शल आर्टच्या हालचालींसह जमिनीवर आदळते. ती सर्व 6 मुलांना तिच्या पायांनी एक-एक करून लाथ मारते आणि त्यांना खाली पाडते. या कॅप्शनसह ‘द फिगेन’ अकाऊंटवरून 25 सेकंदाचा हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

लोकांच्या प्रतिक्रिया

तिने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, “मुलीशी पंगा करू नका! हिया!’ हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 3.5 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि 9,000 हून अधिक वेळा शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून अंदाज लावता येईल तसा तो सीसीटीव्ही फूटेज आहे. नेटिझन्सना तिच्या शौर्याची आणि ताकदीची खात्री पटली होती, तर महिलांना रोज इतकं काही करावं लागतं, याबद्दल अनेकांनी असमाधान व्यक्त केलं. एका युझरने लिहिले की, “कोणत्याही मुलीने याच्याशी संघर्ष करू नये. आपल्या मुलांना हे शिकवा की हे असं वागणं अजिबात चांगलं नाही.” दुसऱ्याने लिहिले, “निंजाचे खरे उदाहरण.”