
सापाचे नाव जरी काढले तरी अंगावर काटा येतो. कारण ते बिषारी असतात आणि त्यांच्या दंशाने क्षणात प्राणावर बेतते. त्यामुळे सापांपासून दूर रहाण्याचा सल्ला दिला जातो. अजगर असो वा साप दोघेही तितकेच धोकादायक असतात. अजगर जरी विषारी नसले तरी त्याच्या ताकदीने ते एखाद्याला बेशुद्ध देखील करु शकतात. सोशल मीडियावर असाच एक खतरनाक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुण कोणत्याही अवजाराशिवाय एका अजगराला नियंत्रित करायला पाहात होता. परंतू त्यानंतर जे घडले त्याने अंगावर अक्षरश: काटा येईल.
व्हिडीओच्या सुरुवातीला पाहता येईल की एक तरुण अजगराच्या तोंडाला त्याच्या बुटाखाली दाबतो आणि बहादुरी दाखवायला जातो. यावेळी दुसऱ्या तरुणाच्या हातात अजगराची शेपटी असते. हा तरुण ही शेपटी सोडून देताच हा अजगर त्या पहिल्या तरुणाच्या पायाला अशा प्रकारे वेटोळे घालायला सुरुवात करतो की त्या तरुणाची चांगलीच जिरते. या तरुणाचा पाय अजगराच्या तोंडावर उचलला जातो आणि नंतर जी फजिती या तरुणाची होते ती पाहाता तो पुन्हा कोणत्याही सापाच्या वाट्याला पुन्हा जाणार नाही याची खात्री पटते. या अजराची मगरमिठी सोडवण्यासाठी या तरुणाला ते करावे लागते याचा व्हिडीओ पाहून आपल्या अंगावरही काटा येईल.
हा शॉकींग व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ( ट्विटर ) वर @blaugrana1O नावाच्या आयडीवरुन शेअर केला गेला आहे. केवळ ५३ सेंकदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत २ दशलक्ष म्हणजे २० लाख लोकांनी पाहिला आहे. तर ५ हजाराहून अधिक लोकांना या व्हिडीओला लाईक देखील केले असून वेगवेगळ्या प्रतिक्रीया देखील नोंदवल्या आहेत.
काही जणांना या व्हिडीओला पाहून खपूच मजेशीर आहे असे म्हटले आहे तर काहींनी म्हटले आहे की या तरुणाने कधी अशी अपेक्षा केली नसेल. एका युजरने लिहिलेय की हा मजेदार नाही. जर तुमच्याकडे सेफ्टी डिव्हाईस नाही तर यास ट्राय करु नये. तो खरोखरचे वेटोळे घालून चावतो. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय की त्याच्या मित्राने जाणीवपूर्वक या अजगराची शेपटी सोडली. नशीब त्याचे प्राण वाचले.
GAGAL JADI OAWANG ULAR😹 pic.twitter.com/Ct4N2P2zyi
— blaugranaline. (@blaugrana1O) March 4, 2026
सापाशी कधीच पंगा घेऊ नये. मग तो साप कोणताही असो. अजगर असला म्हणून काय झाले तो देखील धोकादायकच आहे.कारण अजगर कितीही मोठे भक्ष्य गिळू शकतो. त्यांच्या थेट विष नसले तरी ते गळ्याला लपेटून एखाद्याचा जीव देखील घेऊ शकतात. या अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. कधीही कोणत्या धोकादायक प्राण्यासोबत मस्करी करण्याचा प्रयत्न तुमच्या जीवावर बेतू शकते.