पॅरालिसिसचा नाटक करत होता भिकारी; इंजेक्शन बाहेर काढताच जे घडलं ते …Video Viral
रस्त्यावर भीक मागण्यासाठी एका व्यक्तीने त्याला पॅरालिसीस झाल्याचे नाटक करत होता.याचा एका व्यक्तीला संशय आला . त्याने भिकाऱ्याला आजाराचे कारण विचारले, उपचाराबद्दल विचारलं पण त्याच्या बोलण्यात तफावत होती. त्यामुळे व्हिडिओ करणाऱ्या माणसाने असं काही केलं की थेट तो माणूस उठून पळूनच गेला.पाहा काय झालं.

रस्त्यावर भीक मागणाऱ्या माणसावर आपल्याला अनेकदा दया येते. आपण त्यांना अनेकदा मदतही करतो.काही लोक खरंच गरीब लाचार असतात, तर काही लोकं त्या लाचारीचा फायदा घेतात आणि पैसा लुबाडण्याचा प्रयत्न करतात. आपण सढळ हाताने त्यांना मदत करतोही. त्यांचा फक्त पैसा कमावणं हाच उद्देश असतो. त्यामुळे अनेकदा कोण खरंच गरीब आणि कोण नाटकं करतंय हे ओळखण्यात आपली बऱ्याच वेळी गल्लत होते. असाच एका भिकाऱ्याच्या खोटारड्यापणाचा बुरखा फाडणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर झोपून भीक मागाताना दिसते. त्याला पॅरालिसीस झालाय असं तो सांगतो. त्यामुळे रस्त्यावर झोपून तो व्यक्ती भीक मागत असतो. व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती बराच वेळ त्या व्यक्तीचे निरीक्षण करते.काही काळानंतर ती व्यक्ती त्या भिकारीच्या जवळ जाते. आजार कसा झाला? काही उपचार घेतले की नाही? असे अनेक प्रश्न विचारतो. पण त्या भिकाऱ्याच्या उत्तरात प्रचंड तफावत आढळते.त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला शंका येते.
म्हणून हा व्यक्ती एक इंजेक्शन बाहेर काढतो. भिकाऱ्याला सांगतो की हे इंजेक्शन घेतल्यावर तू एकदम बरा होशील.तुला दुसऱ्या उपचाराची गरजच पडणार नाही. असं बोलताच त्या भिकाऱ्याची पळता भुई थोडी झाली. तो तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. काही वेळानंतर तो भिकारी तिथून उठून पळूही लागला.हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटले याशिवाय हसूही आवरले नाही. याच प्रसंगामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मात्र व्हिडिओ कुठला आहे? कोणी शूट केला आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
एका लबाड भिकाऱ्याचा व्हिडिओ ज्याप्रकारे फाटला आहे, ते पाहून लोक खूप आनंद घेत आहे.एका यूजरने मिश्किल टिप्पणी करत सुई टोचताच थेट ऑलिम्पिक खेळाडूच बनला अशी टिप्पणी केली आहे. तर दुसऱ्याने सुई टोचणाऱ्याला नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे ज्याने रूग्णाला एका सेंकदात बरे केले. तर कित्येकांनी अशा लोकांना अशीच शिक्षा मिळायला हवी अशी टिप्पणी केली आहे.