
आजकाल तरुणाईमध्ये आपल्या जोडीदाराला खास आणि अविस्मरणीय पद्धतीने प्रपोज करण्याची क्रेझ वाढली आहे. याच नादात अनेकजण नवनवीन कल्पना शोधत असतात. पण कधीकधी ही रोमँटिक कल्पना धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाला आपल्या प्रेयसीला प्रपोज करणे चांगलेच महागात पडले आहे.
प्रत्येक प्रियकराची इच्छा असते की छान निसर्गाच्या कुशीत आपल्या प्रेमाची कबुली द्यावी. पण अनेकदा असे रोमँटिक स्वप्न एखाद्या अनपेक्षित अपघातात बदलू शकते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे. अनेकजण इतक्या धोकादायक ठिकाणी प्रपोज करण्याची गरज काय होती? असा प्रश्नही हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विचारत आहे. एका रोमँटिक प्रपोजलचे वेदनादायक अपघातात रुपांतर झाल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक तरुण आपल्या प्रेयसीला प्रपोज करताना दिसत आहे. यासाठी त्याने एक भन्नाट जागा निवडली. तो त्याच्या प्रेयसीला घेऊन एका सुंदर धबधब्यावर गेला. यानंतर तो प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी धबधब्याच्या मधोमध असलेल्या निसरड्या खडकांवर उभा राहिल्याचे दिसत आहे. त्याची प्रेयसी निसर्गाच्या सौंदर्यात मग्न असताना तो तरुण तिला प्रपोज करण्याची तयारी करत असतो. त्याचवेळी अचानक त्याचा पाय घसरतो आणि तो वेगाने वाहणाऱ्या धबधब्यात कोसळतो. यानंतर क्षणात तो तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर वाहत पुढे जातो. आपल्या डोळ्यासमोर घडलेला हा प्रकार पाहून त्याची प्रेयसी पूर्णपणे हादरून जाते. तिच्या तोंडातून शब्दही फुटत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
A dude pops the question to his girl in a crazy dangerous spot…🥺 💔 pic.twitter.com/Gzdxfza5hD
— March (@MarchUnofficial) July 4, 2025
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @MarchUnofficial नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने निसर्गाच्या कुशीत प्रपोज करणे हे कधीकधी किती धोकादायक ठरू शकते, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने इतक्या धोकादायक ठिकाणी कोण कसं प्रपोज करायला जाऊ शकते?” असा प्रश्न विचारला जात आहे. आणखी एका युजरने सध्याच्या पावसाळ्यात अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असा सल्ला दिला आहे. हा व्हिडीओ केवळ मनोरंजन किंवा कुतूहलाचा विषय नसून निसर्गरम्य पण धोकादायक ठिकाणी जाताना किती काळजी घेतली पाहिजे याबद्दलचे आवाहन करत आहे.