Viral Video : येथे आढळला मेलेनिस्टिक टायगर, काळ्या रंगाच्या वाघाचा व्हिडीओ व्हायरल

मेलेनिझम असलेले प्राणी खूप त्वचेत मेलेनिन तयार झाल्याने काळ्या रंगाचे होतात. मेलेनिझम जवळजवळ सर्वच सस्तन प्राण्यात आढळत असतो.

Viral Video : येथे आढळला मेलेनिस्टिक टायगर, काळ्या रंगाच्या वाघाचा व्हिडीओ व्हायरल
BLACK TIGER
Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 05, 2023 | 2:13 PM

नवी दिल्ली | 5 ऑगस्ट 2023 : तुम्ही जंगलातील पट्टेदार वाघाचा जेव्हा विचार करता तेव्हा तुमच्या मनात पिवळ्या तपकीरी आणि काळ्या रंगाचे पट्टे असलेल्या रुबाबदार वाघाचे चित्र तयार होते. सह्याद्रीच्या पट्ट्यात असे पट्टेदार वाघ आढळतच नाहीत. वाघाचे मूळ स्थान बंगालला मानले जाते. रॉयल बंगाल टायगर जगभरात प्रसिद्ध आहेत. आता एका मेलेनिस्टिक वाघाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मेलेनिस्टिक वाघ म्हणजे अनुवांशिक बदलामुळे त्वचेचा रंग बदलतो. अशा दुर्मिळ मेलेनिस्टिक वाघाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

मेलेनिझम असलेले प्राणी खूप त्वचेत मेलेनिन तयार झाल्याने काळ्या रंगाचे होतात. मेलेनिझम जवळजवळ सर्वच सस्तन प्राण्यात आढळत असतो. या प्राण्याच्याा त्वचेवर किंवा केसांवर काळे पट्टे आढळतात. त्वचेवर डार्क पिग्मेटेशन झाल्याने असा प्रकार होतो. इंडीयन फोरेस्ट सर्व्हीस ( आयएफएस ) ऑफीसर रमेश पांडे यांनी एका दुर्मिळ मेलेनिस्टिक वाघाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ओदिशातील सिमिलीपल टायगर रिझर्व्हमधील आहे. ट्वीटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओला रमेश पांडे यांनी कॅप्शन दिली आहे, “ओदिशातील सिमिलीपल टायगर रिझर्व्हमधील मेलेनिस्टिक टायगरचा हा दुर्मिळ व्हिडीओ पाहा. वाघांच्या संख्येतील वांशिक उत्प्रेरकांमुळे काळ्या रंगाचा पट्टेरी वाघ केवळ येथेच आढळतो.”

हा काळ्या रंगाच्या वाघाचा व्हिडीओ एक ऑगस्ट रोजी पोस्ट केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 70 हजार लोकांनी पाहीला आहे. तर 293 युजरनी या व्हिडीओला रिट्वीट केले आहे. तर एक हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे.

येथे व्हिडीओ पाहा –

 

या व्हिडीओला अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल आणि माहीती दिल्याबद्दल आभारी आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटले की प्रथमच अशा वाघाबद्दल ऐकले आहे. आम्ही नक्की या ठीकाणा केव्हातरी भेट देऊ. तर एका युजरने म्हटले की मेलेन्सिस्टीक टायगर ? वॉव, मी पाटीवर असे काळे पट्टे असलेला वाघ मी कधीही पाहीला नव्हता. तर एका युजरने म्हटले की इन्केडीबल ! तर एका युजरने म्हटले की वॉव, तुमची या व्हिडीओवर काय प्रतिक्रीया आहे ?