Video : दोन किलोमीटरचे 500 रुपये, मुंबईचे टॅक्सी ड्रायवर लुटतात की..

फक्त 2 किलोमीटरचे 500 रुपये... टॅक्सी चालकचा हेतू लक्षात येताल भडकला मेक्सिकन पर्यटक, म्हणाला, 'तुम्ही तर देशालाही विकून टाकाल...', व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Video : दोन किलोमीटरचे 500 रुपये, मुंबईचे टॅक्सी ड्रायवर लुटतात की..
| Updated on: Aug 21, 2026 | 9:18 AM

आज मुंबईवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सीच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशात भाडेवाढ देखील होत आहे. पण फक्त 2 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 500 रुपये जरा जास्तच आहे. सांगायचं झालं तर, मुंबईत 2 किलोमीटरचं अंतर कारने कापयाचं असेल तर, जवळपास 50 – 100 रुपये लागतात. पण शहर, कारचा प्रकार, वेळ आणि मागणी यानुसार भाडं बदलतं देखील. पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चालक, प्रवाशाला फसवत असल्याचं दिसून येत आहे. पण प्रवासी देखील मोठ्या हुशारीने चालकाची चोरी पकडतो. मुंबईमध्ये एका टॅक्सी चालकाने मेक्सिकन पर्यटकाकडून फक्त दोन किलोमिटरच्या प्रवासासाठी तब्बल 500 रुपये उकळण्याचा प्रयत्न केला. पण विदेशी पर्यटकाने हिंदीमध्ये बोलण्यास सुरुवात केली, तेव्हा चालकाची बोलतीच बंद झाली. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओनुसार, पर्यटक प्रवासादरम्याव टॅक्सी चालकाला वारंवार विचारत होता की, किती किलोमीटरचा प्रवास आहे आणि किती भाडं झालं आहे? यावर चालकाने 20 किलोमीटरचं अंतर असल्याचं सांगितलं आणि मोबाईलमध्ये पाहून त्याने 500 रुपये झाल्याचं सांगितलं. अशात फक्त 20 किलोमीटरसाठी 500 रुपये जास्त आहेत, हे कळताच पर्यटकाला चालकाचा हेतू लक्षात आला.

 

 

त्यानंतर पर्यटकाने चालकाला फोन – पेवर 5 हजार रुपेय टाईप करुन दाखवले. तरी देखील चालक काहीच म्हणाला नाही… रक्कम बरोबर आहे असं सांगत त्याने पर्यटकाला लुबाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पर्यटकला सुरु असलेला प्रकार खटकला आणि त्याने हिंदी मध्ये बोलण्यास सुरुवात केली…

चालकाचा हेतू लक्षात आल्यानंतर पर्यटक म्हणाला, ‘तुम्ही तर देशालाही विकून टाकाल…’ विदेशी पर्यटकला अस्खलित हिंदी बोलता येत असल्याचं पाहिल्यानंतर पर्यटक देखील अवाक् झाला. पर्यटक म्हणाला, अशी फसवणूक केल्यामुळे देशाची बदनामी होते. 500 रुपयांनंतर पर्यटकाकडून चालकाने 300 रुपये मागितले. पर्यटकाने 20 किलोमीटरच्या प्रवासासाठी 100 रुपये भाडं दिलं आणि कारमधून बाहेर पडला.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us