Viral Video: चांदीची चप्पल, दीड किलो सोने.. लाखोंची कॅश! ट्रान्सजेंडरच्या घरातील व्हिडीओ पाहून चकीत व्हाल
Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तृतीयपंथीच्या घरात असलेल्या वस्तू दाखवण्यात आल्या आहेत. या वस्तू पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

आजकाल सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. अनेकांना रिल्स पाहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे त्या रिल्समध्ये येणारे व्हिडीओ हे कायम चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर एका ट्रान्सजेंडरच्या घरातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रान्सजेंडरने आजवर जे काही कमावले आहे ते दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील चकीत व्हाल.
काय आहे व्हिडीओ?
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका ट्रान्सजेंडरच्या घरातील आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की त्या ट्रान्सजेंडरच्या घरातील बेडवर लाखो रुपयांची कॅश, चांदीची चप्पल, चांदीचे ग्लास, वेगवेगळ्या आकाराची चांदीची भांडी, चांदीचे दागिने दिसत आहेत. त्यासोबतच सुमारे दीड किलो सोने दिसत आहे. हे सर्व सामान जप्त करण्यात आले आहे. पण आता प्रश्न उपस्थित होतो की, एका ट्रान्सजेंडरच्या घरी इतकी मोठी रक्कम आली कुठून? चला, जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे…
वाचा: चौघुले जरा इकडे या… भर विमानात मुख्यमंत्री फडणवीसांनी आवाज दिला अन्…
इनकम टैक्स के अफसरों ने “किन्नरों” के घर पर छापा मारा जहां उन्हें भरी मात्रा में Cash और Gold 🪙 मिला।
किन्नरों के पास इतना सोना और कैश कहां से आया..??
आपको क्या लगता है..??l pic.twitter.com/DhzWoYgvUO
— Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) September 19, 2025
आयकर विभागाचा छापा
खरंतर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दावा केला जात आहे की, आयकर विभागाच्या छापेमारीत किन्नरच्या घरी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हा व्हिडीओ शेअर करताना शीतल यादव नावाच्या एका युजरने लिहिले, “आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रान्सजेंडरच्या घरी छापा टाकला. तिथे त्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि सोने सापडले. किन्नरांकडे इतके सोने आणि रोख कुठून आले..?? तुम्हाला काय वाटते..?” हा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतक्रिया
आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक लोक व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ स्वतः ट्रान्सजेंडरने बनवला आहे आणि व्हिडीओमध्ये बोलत आहे की, आयकर विभागाने घरी छापा टाकला आहे. अनोळखी लोक माझ्या घरात घुसले आणि भेटवस्तू म्हणून मिळालेल्या वस्तू आणि रोख रक्कम काढून घेत आहेत. टीव्ही ९ मराठी या व्हिडीओची पुष्टी करत नाही.
