दोन बैलांच्या भांडणात महिलेची एन्ट्री! स्कूटरवरून आणि अन्…; बघा Viral Video
दोन बैलांच्या भांडणाचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हे दोन्ही बैल एकमेकांशी जोरदार झुंज देत होते, तितक्यात एक महिला स्कूटरवरून तिथे आली. हा सगळा प्रकार पाहून तुम्हाला हसू येईल.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओ बघून तुम्हाला प्रचंड हसायला येईल. या व्हिडीओमध्ये दोन बैल एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. पण पुढे असं काही होतं की सगळेच बघत बघतात. या दोघांच्या भांडणात अचानक एका महिलेची एंट्री होते. ही महिला स्कुटरवर येते. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून सगळेच त्यावर कमेंट्स करत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ikaddy_ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की रस्त्याच्या बाजूला दोन बैल एकमेकांशी भांडण करत आहेत. दोघे आपली शिंग एकमेकांमध्ये फसवून भिडत आहेत. पूर्ण ताकदीने हा वाद सुरु आहे. एकमेकांना दोघे पाठी ढकलायचा प्रयत्न करत होते. या व्हिडीओमध्ये दोघांमध्ये मोठी लढाई सुरू झाल्याचे दिसते.
अचानक होते महिलेची एन्ट्री!
या दोघांची घमासान मारामारी सुरु असताना आणि दोघांपैकी कोणीही हार मानायला तयार दिसत नाहीत. कधी एक बैल दुसऱ्याला मागे ढकलतो, तर कधी दुसरा बैल आपली पूर्ण ताकद लावून पलटवार करतो. यामुळे, रस्त्याच्या कडेचे वातावरण अत्यंत रंजक बनले आहे. त्यांच्या या भांडणाचा निकाल सहजासहजी लागणार नाही असं दिसत असतानाच खरा मजेशीर ट्विस्ट त्यानंतर येतं. जेव्हा दोन बैल आपापल्या लढाईत पूर्णपणे मग्न असतात, तेव्हा एक महिला स्कूटरवरून एंट्री करते. विशेष म्हणजे, कोणताही विचार न करता ती थेट त्या दोन बैलांच्या मध्ये स्कूटर चालवत नेते. तिला पाहताच, दोन्ही बैल अचानक मागे सरकतात आणि त्यांचं भांडण लगेच थांबते. यानंतर, ती महिला पुन्हा आपल्या स्कूटरवर बसली आणि ती पुन्हा व्यवस्थित उभी केली. जसे दोन्ही बैल एकमेकांना मागे ढकलण्यासाठी पूर्ण ताकद लावतात, तसे तिथे तीन महिला येतात आणि थांबतात. व्हिडीओचा हा भाग पाहून लोकांना सर्वात जास्त हसू येते.
व्हिडीओ पाहता असे वाटतं की, ती महिला जवळ येताच त्या दोन बैलांनी आपलं भांडण काही काळासाठी थांबवली.