Viral | जेव्हा अस्वल रस्त्याच्या कडेला पोल डान्स करतो, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात एक नंबर डान्स

सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एका अस्वलाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की अस्वल पोल डान्स करत आहे.

Viral | जेव्हा अस्वल रस्त्याच्या कडेला पोल डान्स करतो, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात एक नंबर डान्स
bear
| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 3:59 PM

मुंबई : सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एका अस्वलाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की अस्वल पोल डान्स करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियीवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 16 लाख 60 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

तुम्ही कधी अस्वलाला ‘पोल डान्स’ करताना पाहिले आहे का? एक अस्वलाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.या व्हिडीओला आतापर्यंत 16 लाख 60 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अस्वल पोल डान्स कसा करू शकतो, असा प्रश्नही तुमच्या मनात निर्माण होत असेल. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण.

25 ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ अर्थफोकस (earthfocus)नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. युजरच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ सर्वप्रथम TikToker jcruzalvarez26 ने शेअर केला होता. मात्र हा व्हिडीओ कुठचा आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अस्वलाच्या शरीराला अलेली खाज दूर करण्यासाठी त्याने हा प्रसत्न केला. पण हा सर्व प्रकार पाहता तो पोल डान्स करत असल्याचे दिसून येत आहे.

चला तर मग पाहूया हा मजेदार व्हिडीओ

अस्वलाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की याला खाज येत नाही, तर त्याला पोल डान्स समजा. कारण अस्वल ज्या पद्धतीने पोलवर आपली पाठ घासताना दिसत आहे. ते दृष्य पाहून तो पोल डान्स करत आहे असे वाटत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच हसू उमटले असेल.

अर्थ फोकसने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे. यावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्यानी त्यावर कमेंन्ट केली आहे की ‘अप्रतिम दृश्य, किती परफेक्ट क्लिक.’ त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘मी पहिल्यांदाच असा डान्स करणारा अस्वल पाहिला आहे.’

हेही पाहा:

प्रेम म्हणजे काय असतं? चिमुरडीचं पत्रातून भन्नाट उत्तर, हर्ष गोयंकांकडून पत्र ट्विट!

Video: मोड आलेल्या कडधान्यापासून बनवलेली अनोखी चाट, कानपूरचे चाटवाले आजोबांचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल